• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

तालुक्यात सर्वञ थंडीची लाट नागरिकांनी काळजी घ्यावी : सुरेश शेजूळ तहसीलदार परळी वैजनाथ

ByND NEWS INIDIA

Jan 9, 2023

तालुक्यात सर्वञ थंडीची लाट नागरिकांनी काळजी घ्यावी : सुरेश शेजूळ तहसीलदार परळी वैजनाथ
 वातावरणामध्ये बदल झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून बीड जिल्ह्यामध्ये थंडीचा कडाका वाढला आहे

 शरीर उबदार ठेवण्यासाठी करा खालील प्रमाणे उपाय योजना

ND NEWS LIVE MAHARASHTRA:
परळी वैजनाथ तालुक्यातील सर्व जनतेस कळविण्यात येते की,परळी वै तालुक्यात सर्वञ थंडीची लाट आलेली आहे. तरी सर्व जनतेने खबरदारीचा उपाय म्हणून उबदार कपडे घालावेत.शक्यतो घराबाहेर पडू नये.काम असेल तर घराबाहेर पडावे.थंडीपासून बचाव करावा.
 शरीर उबदार ठेवण्यासाठी करा हे उपाय
हिवाळ्यात हर्बल चहा प्यायल्याने शरीराला ऊब मिळते. ग्रीन टी, तुळशीचा चहा आणि आल्याचा चहासुद्धा शरीरासाठी फायदेशीर आहे. हिवाळ्यात शरीर आतून उबदार ठेवायचे असेल तर दालचिनी पाण्यात उकळून प्या. कारण दालचिनीमध्ये अँटिऑक्सिडेंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात. हळदीचे दूध पिणेही उत्तम असते. हळदीमध्ये अँटिऑक्सिडेंट, अँटीव्हायरल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. ते शरीराला आतून उबदार ठेवण्यास मदत करतात. लिंबू घालून गरम पाणी प्यायल्यास शरीर उबदार राहते. तसेच शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यासही मदत होते.