• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

७७५१ गावोगावी निवडणुकांचं धुमशान

ByND NEWS INIDIA

Nov 9, 2022

ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर,जनतेतून सरपंचांची निवड

मुंबई : राज्य निवडणूक आयोगानं राज्यातील ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या सुमारे ७७५१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यातील ७७५१ गावांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी पार पडणार आहे. १८ नोव्हेंबरला संबंधित तालुक्यातील तहसीलदार निवडणुकीची नोटीस जारी करतील. १८ डिसेंबरला मतदान होणार असून २० डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे.
ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या सुमारे ७७५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका यापूर्वी लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या.
तहसिलदरा निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणार : १८ नोव्हेंबर

अर्ज दाखल करण्याची मुदत : २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर

अर्ज छाननी : ०५ डिसेंबर

अर्ज मागं घेण्याचा दिनांक : ७ डिसेंबर

निवडणूक चिन्ह वाटप : ७ डिसेंबर दुपारी ३ नंतर

मतदानाची तारीख : १८ डिसेंबर

मतमोजणी आणि निकाल : २० डिसेंबर

निकालाची अधिसूचना : २३ डिसेंबर