• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

पीएम मोदींच्या कपड्यांची चर्चा, महिलेला दिलेलं वचन केलं पूर्ण

ByND NEWS INIDIA

Oct 31, 2022

पीएम मोदींच्या कपड्यांची चर्चा, महिलेला दिलेलं वचन केलं पूर्ण

पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तराखंड दौऱ्यावर आहेत. त्यांनी केदारनाथ मंदिरात पूजा, रुद्राभिषेकही केला. यावेळी पीएम मोदी एका खास कपड्यांमध्ये दिसले. या ड्रेसची सर्वत्र चर्चा आहे. हा ड्रेस पंतप्रधानांना एका महिलेने गिफ्ट केला होता.

चोला डोरा ड्रेस
पंतप्रधान मोदींना महिलेने हा खास चोला डोरा ड्रेस गिफ्ट केला

महिलेने गिफ्ट केलेला ड्रेस
हा ड्रेस हिमाचलमधील चंबामध्ये राहणाऱ्या महिलेने स्वत:च्या हाताने बनवला आहे. त्यावर अतिशय सुंदर हस्तकला आहे

महिलेला दिलेलं वचन पूर्ण
पंतप्रधानांना ज्यावेळी महिलेने हा ड्रेस गिफ्ट केला होता, त्यावेळी मोदींनी महिलेला वचन दिलं होतं
काय दिलं होतं वचन

मोदींनी महिलेला सांगितलेलं, की ते कोणत्याही थंड प्रदेशात जातील, त्यावेळी हा ड्रेस नक्की घालतील

केदारनाथ यात्रेवेळी खास ड्रेस

पंतप्रधान मोदी आता उत्तराखंड दौऱ्यावर असून त्यांनी महिलेला वचन दिल्याप्रमाणे केदारनाथ यात्रेवेळी हा गिफ्ट केलेला ड्रेस घातला.