• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

ईद मिलाद उन-नबी, जाणून घ्या ​इतिहास आणि महत्त्व

ByND NEWS INIDIA

Oct 9, 2022

ईद मिलाद उन-नबी, जाणून घ्या ​इतिहास आणि महत्त्व

‘सर्वात उदात्त व्यक्ती तो आहे, ज्यामध्ये मानवता आहे, असा संदेश हजरत मुहम्मद साहब यांनी संपूर्ण जगाला दिला

इस्लाम धर्माचे शेवटचे पैगंबर मोहम्मद साहब यांचा जन्म मक्का येथे झाला होता.

ND NEWS MAHARASHTRA

 

इस्लाम धर्मात ईद मिलाद उन-नबी (Eid Milad-un-Nabi 2021) या उत्सवाचं अनन्य साधारण महत्त्व आहे. ईद-ए-मिलाद (Eid-e-Milad) किंवा मालविद (Mawlid) या नावानं देखील हा सण ओळखला जातो. देशातच नाही तर जगभरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

इस्लामिक कॅलेंडरनुसार, (miladi nabi) इस्लाम धर्मातील तिसरा महिना अर्थात मिलाद उन-नबीची सुरूवात झाली आहे. याच महिन्याच्या 12 तारखेला म्हणजेच इ.स.पूर्व 571 मध्ये पैगंबर मोहम्मद (prophet’s birthday) यांचा जन्म झाला होता. यानिमित्त (milad un nabi 2021 date) भारतीय उपखंडात मोठ्या हर्षोल्लासात ईद-ए-मिलाद उन-नबी हा सण साजरा केला जातो. यंदा ईद-ए-मिलाद (Eid-e-Milad) 19 ऑक्टोबर रोजी आहे. ईद मिलाद उन-नबी (milad un nabi 2021) च्या दिवशी पैगंबर मोहम्मद (prophet’s birthday) यांच्या आठवणी मिरवणूक (जुलूस) काढण्यात येते. ठिकठिकाणी मोठ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं.

काय आहे ईद मिलाद उन-नबीचा इतिहास?

असं सांगितलं जातं की, इस्लामिक कॅलेंडरच्या तिसऱ्या महिन्याच्या 12 तारखेला इस्लाम धर्माचे शेवटचे पैगंबर मोहम्मद साहब यांचा जन्म मक्का येथे झाला होता. त्यामुळे आजचा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पैगंबर मोहम्मद साहब यांचं पूर्ण नाव पैगंबर हजरत मोहम्मद सल्लल्लाहुअ अलैही वसल्लम असं होतं. त्यांच्या आईचं नाव अमीना बीबी आणि वडील अब्दुलाह होते. पैगंबर हजरत मोहम्मद यांना अल्लाहनं पवित्र कुरान अदा केली होती. त्यानंतर पैगंबर साहब यांनी पवित्र कुरानमधील अमुल्य संदेश इस्लाम धर्मातील तळागाळातील व्यक्तीपर्यंत पोहोचवला. ‘सर्वात उदात्त व्यक्ती तो आहे, ज्यामध्ये मानवता आहे, असा संदेश हजरत मुहम्मद साहब यांनी संपूर्ण जगाला दिला आहे.
ईद मिलाद उन-नबीचं महत्त्व…

पैगंबर हजरत मोहम्मद साहब यांचा जन्मदिन ‘ईद मिलाद उन-नबी’ म्हणून साजरा करण्यात येतो. ईद मिलाद उन-नबीच्या दिवशी घर आणि मशिदी विद्यूत रोषणाईनं सजवल्या जातात. रात्रभर प्रार्थना केली जाते. ठिकठिकाणी मिरवणुका काढल्या जातात. इस्लामी व्यक्ती या दिवशी हजरत मोहम्मद यांचे पवित्र वचनांचे पाठ करतात. घराघरात तसेच मशिदींमध्ये कुरान पठण केलं जातं. सोबतच समाजातील दीन-गरीबांना मदत केली जाते.