• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

तडोळी येथे प्रदीप मुंडे यांच्या हस्ते दुर्गादेवीची आरती संपन्न!

ByND NEWS INIDIA

Oct 4, 2022

 

शेतकऱ्यांचे पीक पाणी पिकू दे ,भरघोस उत्पादन दे, सर्वांना आरोग्य दे देवीला प्रार्थना करून घातले साकडे!

परळी वैजनाथ प्रतिनिधी

नागापूर जिल्हा परिषद गटातील तसेच परळी तालुक्यातील मोजे तडोळी येथे गटाचे सदस्य प्रदीप भैय्या मुंडे (बबलू सेठ) यांच्या हस्ते येथील दुर्गादेवीची आरती संपन्न झाली. शेतकऱ्यांचे पीक पाणी पिकू दे , भरघोस उत्पादन दे सर्वांना आरोग्य दे अशी प्रार्थना करून देवीला त्यांनी साकडे घातले.

नवरात्र उत्सवातील तडोळी येथे ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते नवरात्रीनिमित्त दुर्गादेवीची आरती संपन्न झाली तडोळीमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नवरात्र उत्सवात दुर्गा देवीची घटस्थापना तसेच मूर्ती स्थापना केली गेली आहे. अतिशय उत्साहात नवरात्र उत्सव ग्रामस्थ साजरा करतात. दुर्गा देवी कमिटीच्या वतीने आणि गावकऱ्यांच्या वतीने नागापूर जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य प्रदीप भैय्या मुंडे यांना आरतीचा मान देण्यात आला. गावकऱ्यांच्या व कमिटीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी संभाजी सातभाई ,वैद्यनाथ सातभाई, विष्णू सातभाई, केशव सातभाई ,नारायण कांदे, वसुदेव सातभाई ,उनकेश्वर सातभाई, ऋषिकेश सातभाई ,प्रदीप शिंदे, बळीराम सातभाई ,शरद गायकवाड ,सचिन सातभाई, अनंत सातभाई ,विनोद सटाले, अशोक सटाले ,संपत सातभाई, चंद्रकांत सातभाई ,पंडित सातभाई ,आदीसह गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण, देवीचे भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.