• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

हिंदू राष्ट्र संघटनेच्या अध्यक्षांवर जीवघेणा हल्ला

ByND NEWS INIDIA

Sep 6, 2022

ND NEWS |
हिंदू राष्ट्र संघटनेचे तुषार हंबीर यांच्यावर ससून रुग्णालयात हल्ला करण्यात आला. तुषार हंबीर यांच्यावर पोलीस संरक्षणातच हल्ला करण्यात आल्यानं अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. तुषार हंबीर हा स्वतः एका आरोपी आहे. तो सध्या येरवडा कारागृहात मोक्का गुन्ह्याखाली अटकेत आहे.

तुषार हंबीर याला काल उपचारासाठी ससून रुग्णालयात आणण्यात आलं होतं. त्याचवेळी चार जणांनी तुषार हंबीर यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यामध्ये एक पोलीस कर्मचारी देखील गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळतेय. सध्या या गोळीबार प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र ससून रुग्णालयात झालेल्या या गोळीबाराच्या घटनेनं इतर रुग्णांमध्येही भीतीचं वातावरण आहे.