• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

संजय राऊतांना दिलासा नाहीच

ByND NEWS INIDIA

Sep 5, 2022

ND NEWS I
मुंबईच्या गोरेगाव येथील पत्रा चाळीच्या आर्थिक व्यवहारात गैरप्रकार झाल्याच्या आरोपाखाली संजय राऊत यांना अटक करण्यात आली आहे.
संजय राऊत यांचा ईडी कोठडीतील मुक्काम 19 सप्टेंबरपर्यंत लांबला आहे. पत्रा चाळ घोटाळाप्रकरणी संजय राऊत यांना ईडीने अटक केली होती. त्यानंतर संजय राऊतांच्या ईडी कोठडीत पुन्हा एकदा वाढ करण्यात आल्याचं पाहायल मिळालंय. 1 ऑगस्ट रोजी शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली होती. आता महिला उलटून गेला, तरी संजय राऊत हे कोठडीत आहेत.
ईडीने ताब्यात घेतल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांना 8 ऑगस्ट रोजी न्यायालयीन कोठडीत पाठण्यात आलं होतं. त्यानंतर पीएमएलए कोर्टाने संजय राऊतांची न्यायालयीन कोठडी पाच सप्टेंबरपर्यंत वाढवली होती. या कोठडीत वाढ केली जावी, अशी मागणी ईडीने केली होती. ईडीने केलेल्या मागणीनुसार संजय राऊतांची कोठडी आणखी 14 दिवसांनी वाढवण्यात आलीय. मुंबईच्या गोरेगाव येथील पत्रा चाळीच्या आर्थिक व्यवहारात गैरप्रकार झाल्याच्या आरोपाखाली संजय राऊत यांना अटक करण्यात आली आहे. आता पुन्हा एकदा त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आल्यानं संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या आहेत.