• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

प्रा. टी.पी. मुंडे यांच्या हस्ते राधा मोहन प्रतिष्ठानच्या गणरायाची आरती!

ByND NEWS INIDIA

Sep 4, 2022

परळी वैजनाथ प्रतिनिधी
राधा मोहन प्रतिष्ठान व मराठवाडा साथी यांच्या संयुक्त विद्यामानाने आयोजित गणेश महोत्सव 2022 च्या गणरायाची सकाळच्या सत्रातील आरती लोकनेते प्रा.टी. पी. मुंडे (सर) यांच्या हस्ते संपन्न झाली. शेतकरी ,शेतमजूर, कष्टकरी यांना सुखी ठेवण्याची प्रार्थना करून साखडे गणरायाकडे त्यांनी घातले. राधा मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचा सत्कार प्रभू वैजनाथ ज्योतिर्लिंगाची प्रतिमा, पुष्गुच्छ देऊन करण्यात आला.

राधा मोहन प्रतिष्ठानच्या वतीने साकारण्यात आलेल्या देखाव्याची पाहणी केली.राधा मोहन प्रतिष्ठान व मराठवाडा साथी आयोजित गणेश महोत्सवामध्ये साकारण्यात आलेला अष्टविनायकाचा देखावा लोकांचे मन आकर्षित करतो आणि साक्षात आपण अष्टविनायकाचे दर्शन करीत असल्याचा अनुभव येतो अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

दरवर्षी राधा मोहन प्रतिष्ठानच्या गणरायाच्या आरतीचा मान त्यांना दिला जातो .यावर्षी गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात सुरू आहे भक्त बाप्पाच्या चरणी लीन होतात देखावा पाहण्यासाठी अनेक भक्त येतात. अष्टविनायकांची मान्यवरांच्या हस्ते आरती संपन्न झाली. अष्टविनायकाचा देखावा गुरुकुल शिक्षण पद्धती मन आकर्षित करणारे देखावे आहेत पारंपारिक गुरुकुल पद्धती कशाप्रकारे शिक्षण देत असे याचा सुंदर देखावा सादर केला आहे त्याच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे जतन करण्याचा उद्देश आणि संदेश दिला जात आहे.

यावेळी महेश बँकेचे अध्यक्ष फुलचंदजी मुडदा, लोकमान्य पतसंस्थेचे अध्यक्ष पी. एस. घाडगे सर, जागृती पतसंस्थेचे अध्यक्ष प्रा. गंगाधर शेळके,नर्सिंग सिरसाठ , रिपाई नेते सोपान ताटे, आदी मान्यवर उपस्थित होते उपस्थितांचे स्वागत चंदुलाल बियाणी, सतीश बियाणी यांनी