• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

गरीब मराठा समाजातील मुलांनाही आरक्षण मिळायला हवं: छत्रपतीं संभाजीराजे

ByND NEWS INIDIA

Aug 20, 2022

ND NEWS : दहीहंडी जगात काही ठिकाणी खेळला जाणार प्रकार आहे. मात्र मुंबई, पुणे, ठाणे या परिसरात तो जास्त खेळला जातो. त्याला साहसी खेळाचा दर्जा देत असतील तर चांगलेच आहे, असे संभाजी छत्रपती म्हणाले.

दहीहंडीचा क्रीडा प्रकारात समावेश होत असेल तर चांगली बाब आहे.  खेळाडूंना आरक्षण मिळत असेल तर तेही चांगलेच. मात्र गरीब मराठा समाजातील मुलांनादेखील आरक्षण मिळायला पाहिजे. ही बाब ध्यानात ठेवावी, अशी अपेक्षा संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली आहे. ते पुण्यात बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच गोविंदांच्या आरक्षणाचा निर्णय जाहीर केला होता. त्यावर विविध स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. कुणी स्वातग करत आहे, तर कुणी या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत टीका करत आहे. संभाजीराजे यांनीही या मुद्द्यावर आपले मत व्यक्त केले.