• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त अँड. मनोज संकाये मित्र मंडळाचा अनोखा उपक्रम!

स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबीयांचा गौरव सोहळा संपन्न!*

*भारताच्या स्वातंत्र्याच्या चळवळीत सहभागी झालेल्यांचा गौरव करणे माझे भाग्य—अँड.मनोज संकाये*

परळी वैजनाथ प्रतिनिधी

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संबंध देशभरामध्ये अनोख्या उपक्रमाने साजरा होत आहे त्यात भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त येथील आर्य समाज येथे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत प्रत्यक्ष सहभाग घेतलेल्या स्वतंत्र सेनानींच्या कुटुंबीयांचा गौरव सोहळा अँड.मनोज संकाये मित्र मंडळाच्यावतीने मोठ्या उत्साहात संपन्न झाला. स्वातंत्र्याच्या चळवळीत प्रत्यक्ष सहभाग घेतलेल्या स्वतंत्र सैनिकांच्या कुटुंबीयांचा गौरव करणे हे माझे भाग्य आहे असे प्रतिपादन अँड.मनोज संकाये यांनी केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वेगवेगळे उपक्रम संबंध देशभरामध्ये घेतले जात आहेत त्यातच परळी येथील अँड.मनोज संकाये यांचा उपक्रम लक्षवेधी ठरला आहे. त्यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबीयांचा भारत मातेची प्रतिमा, शाल श्रीफळ आणि पेढे भरऊन गौरव केला. परळीतील तीन कुटुंबीयांचा गौरव सोहळा संपन्न झाला. त्यामध्ये प्रयागबाई गणपतराव देशमुख, शांताबाई प्रभू आप्पा मिसाळ आणि स्वातंत्र्यसेनानी नाईक सुभेदार शेख अहमद आदींचा समावेश आहे.

  स्वातंत्र्य चळवळीमध्ये स्वातंत्र सैनिकांचे मोठे योगदान असून त्यामुळेच आपण स्वातंत्र्याची फळे चाखतो आहोत. स्वातंत्र्य चळवळीत स्वातंत्र्यसेनानी लढत असताना त्यांच्या परिवाराकडे दुर्लक्ष झाले अशी खंतही त्यांनी व्यक्त केली तसेच सर्वांना भारतीय स्वातंत्र्याच्या त्यांनी शुभेच्छा दिल्या.

  यावेळी सुरेश देशमुख ,विजय मिसाळ, नगरसेवक चेतन सौंदळे, शेखर चौधरी, एम आय एम चे शहराध्यक्ष अकबर कच्ची ,नितीन शिंदे ,रमेश चौधरी ,मकरंद नरवणे, कैलास रीकिबे, शिवा बडे ,काशिनाथ सरवदे ,नागेश वाव्हले, शिवाजी शिंदे ,शेख अबेर, फिरोज खान ,बालू गुट्टे, सोमनाथ गीते ,विशाल गीते, अविनाश चौधरी ,रत्नेश बेलुरे, रमेश संकाये ,शेख अतीफ ,अन्वर शेख ,प्रवीण रोडे, नवनाथ क्षीरसागर ,राम चाटे, अझर इनामदार ,राहुल काळे ,संदीप चौधरी ,बंडू केंद्रे ,परमेश्वर फड, परमेश्वर मुंडे ,सलीम कुरेशी, आदिसह असंख्य मित्र मंडळाचे पदाधिकारी नागरिक उपस्थित होते.