• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

पदोन्नती बद्दल उपमुख्य अभियंता श्याम राठोड यांचा सत्कार!

ByND NEWS INIDIA

Aug 4, 2022

 

ND NEWS: परळी

मागील चार वर्षापासून औष्णिक विद्युत केंद्र परळी येथे अधिक्षक अभियंता तथा प्रभारी उपमुख्य अभियंता म्हणून कार्यरत असलेले शाम राठोड यांची पदोन्नती होऊन उपमुख्य अभियंता या पदावर पारस औष्णिक केंद्र येथे बदली झाली आहे .या निमित्त त्यांना परळी औष्णिक विद्युत केंद्र प्रशासनातर्फे भावूक वातावरणात निरोप देण्यात आला. महानिर्मिती कंपनीमध्ये 7मे 1993 रोजी रुजू झालेले शाम राठोड यांनी कोरडी, खापरखेडा , चंद्रपूर, व परळी आशा ठिकाणी सेवा बजावली. त्यांच्या प्रगतीचा आलेख 2012 कार्यकारी अभियंता,2016 अधिक्षक अभियंता ते सध्या उपमुख्य अभियंता असा आहे.मागील 4 वर्षापासून परळी औष्णिक विद्युत केंद्र येथे उत्कृष्ट अशी कामगिरी बजावल्यामुळे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली राठोड साहेब यांचा सत्कार व पारस ओ.वि केंद्र या ठिकाणी बदली झाली म्हणून निरोप समारंभ संपन्न झाला या कार्यक्रमाला उपमुख्य अभियंता दिनकर इंगळे, अधीक्षक अभियंता एच.के.अवचार, कार्यकारी अभियंता अरविंद येळे व धनंजय कोकाटे ,उप कार्यकारी अभियंता कोळे,प्रदीप चव्हाण ,माधव मुंडे ,सतीश मुंडे ,यशवंत पवार, दिनेश कदम, संदीप काळे ,संदीप पाटील ,अशोक मुंडे, हारि गिते ,शशिकांत केंद्रे, राहुल जाधव, प्रकाश थोरात ,महादेव दहिफळे ,ऋषिकेश मुंडे ,अमोल कुकर, मोहन मेकाले, कंत्राटदार भगवान साकसमुद्रे आदि उपस्थित होते