• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

देशाला एकसंघ ठेवते ते डॉ.बाबासाहेब आंबेडकराचं संविधान-पोनि सुरेश चाटे

मुप्टा शिक्षक संघटनेचा आरोग्यदायी स्तुत्य उपक्रम-डॉ.दिनेश कुरमे

ND NEWS परळी वै….प्रतिनिधी:

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती मुप्टा शिक्षक संघटनेच्या वतिने सामाजिक उपक्रमाने साजरी करण्यात आली. ख-या अर्थाने देशाला एकसंघ ठेवते ते डॉ.बाबासाहेब आंबेडकराचं संविधान अस प्रतिपादन संभाजी नगर पोलिस निरिक्षक पोनि सुरेश चाटे यांनी केले तर मुप्टा शिक्षक संघटनेचा आरोग्यदायी स्तुत्य उपक्रम असल्याचे मत उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.दिनेश कुरमे यांनी व्यक्त केले.

मुप्टा शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष भैयासाहेब आदोडे यांच्या नेतृत्वाखाली परळी येथील भिमवाडी चौक येथे नेहमी सामाजिक उपक्रम घेण्यात अग्रेसर असलेल्या मुप्टा शिक्षक संघटनेच्या वतिने डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती निमित्तानं संभाजी नगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक सुरेश चाटे,वैद्यकिय अधिक्षक डॉ.दिनेश कुरमे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन व पुष्पहार अर्पण करुन कोरोनाच्या युध्दात फ्रन्टलाइन वर्कर  म्हणुन कार्यरत असलेले कर्मचारी व शेकडो नागरीकांना 2000 हजार सॕनिटायझर,5000 मास्क वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणुन नगरसेवक सचिन कागदे,राष्ट्रवादीनेते माधव ताटे,कामगारनेते आर.एच.व्हावळे,कामगारनेते भाई गौतम आगळे,काॕग्रेचेनेते विश्वनाथ गायकवाड,मराठी पञकार परिषदेचे तालुकाध्यक्ष दत्ताञय काळे,शहराध्यक्ष जगदिश शिंदे युवानेते सुनिल चिकाटे, मुख्याद्यापक सुरेश रोडे,युवानेते सुनिल कांबळे,संजय गुट्टेसर, कॉन्ट्रॅक्टर राहुल गोदाम,युवानेते यशपाल मुंडे अदी मान्यवर उपस्थित होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करुन सॕनिटायझर,मास्क वितरण करण्यात आले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  रमेश रायभोळे,अतिष आदोडे,विजय व्हावळे,संदिप मस्के,शरण मस्के,बुध्दानंद व्हावळे,नागसेन रोडे,धम्मा रोडे,किरण रोडे,आदर्श मस्के,संकेत दहिवडे,विकास वाघमारे,आदित्य वंजारे,अविष्कार ताटे,उत्तम घाटे,वैभव भोकरे,राज मस्के,शरद रोडे,विनोद कांबळे,किरण हानवते,अतिष भोकरे,रिंकु रायभोळे,बबलु कांबळे