• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

“काय झाडी, काय डोंगार, काय हाटील”, आता गाणंही आलं..

काय झाडी, काय डोंगार, काय हाटील… एकदम ओक्केमधी हाय..’ हा डायलॉग सध्या महाराष्ट्रभर व्हायरल होतोय. एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यानंतर जे शिवसेनेचे जवळपास 47 आमदार शिंदेंसोबत गेले त्यात एक नाव म्हणजे सांगोला मतदारसंघाचे आमदार शहाजीबापू पाटील. नुकत्याच त्यांच्या एका व्हायरल झालेल्या कॉल रेकॉर्डिंगमुळे सध्या ते चांगलेच चर्चेत आले आहेत.

राज्यात सध्या राजकीय वातावरण तापले असताना मागील काही दिवसांत शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार असलेले शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) गुवाहाटीमधील हॉटेल रॅडीसन ब्ल्यू हॉटेलमध्ये असताना एका कार्यकर्त्यासोबत कॉलवर बोलले असताना ते कॉल रेकॉर्डिंग भलतंच व्हायरल झालं आहे. बघता बघता या तीन ते चार दिवसांत ते राज्यभर पसरलं. लोक सोशल मीडियावर शेअर देखील करू लागले आहेत. आमदार शहाजीबापू पाटील यांना हा फोनकॉल व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्रभर त्यावर मीम्स बनवले जात आहेत.