• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

अग्निपथ योजना नसुन गोरगरीबांच्या स्वप्नांना आग आहे – युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन रोडे

ByND NEWS INIDIA

Jun 18, 2022

 

केज तालुका प्रतिनिधी : हनुमंत गव्हाणे

सैन्य दलातील भरतीसाठी केंद्र सरकारने जाहिर केलेली अग्निपथ योजना ही अतिशय चूकीची आहे ना कोणती रैंक ना पेंशन दोन वर्षा पासुन थेट भरती नाही चार वर्षा नंतर स्थिर भवितव्य दिसत नाही केंद सरकारच्या मनामध्ये लश्करा बाबत सन्मानच नाही अशी परस्थिति दिसु लागली आहे देशातील बेरोजगार युवकांचा आवाज ऐकण्याची क्षमता केंद्र शासनाची राहिली नाही सध्या पंधरा वर्ष लश्करा मध्ये नियमित नोकरी करूण निवृत होणाऱ्या जवानानांही खाजगी क्षेत्र नोकरी नाकारते आशा परस्थितित चार वर्षाच्या नोकरी नंतर बेरोजगार होणाऱ्या या हजारों अग्नि वीरांना नोकरी देणार चार वर्षानी दरवर्षी 75 टक्के तरुण बेरोजगार होणार असतील तर त्यांना सामावुन घेण्यासाठी यंत्रना तयार आहे का असे अनेक प्रश्न या अग्निपथ योजन विरोधात उपस्थित होत आहेत तरीही केंद शासन ही योजना देशामध्ये लागु करण्याच्या तयारीत आहे या विरोधात हरियाणा च्या विद्यार्थ्यानी आत्महत्या केली तसेच बिहार हिमाचल राजस्थान उत्तर प्रदेश या ठिकाणी विद्यार्थ्यांनी खुप मोठ्या प्रमाणात आंदोलन उभे केले आहे तसेच आमच्या केज तालुक्यातील ही खुप विद्यार्थ्यांचे देशाच्या रक्षनासाठी फ़ौज मध्ये जाण्याची स्वप्ने आहेत आर्थिक दृष्टया परस्थितिने नाजुक असणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील विद्यार्थी शिक्षना साठी पैसा खर्च करू शकत नाहीत ते व्यायाम करूण भर्ती होण्यासाठी दोन तीन वर्षे प्रयत्न करतात आणि त्यात पुन्हा केंद्रशासन या विद्यार्थ्यांना चार वर्षेच नोकरी देणार ही शासनाची अन्यायाची भूमिका दिसत आहे सैनिक भरती मध्ये टाटा बिर्ला अंबानी यांची पोर जात नाहीत घाम गाळणाऱ्या शेतकरी गोरगरीबांची पोर जातात त्यामुळे हा पूर्णपणे अन्याय याच लोकांवर आहे असे युवक कॉंग्रेसचे केज शहराध्यक्ष सचिन रोडे यांनी सांगितले