• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

वरूड ज.उपोषणाला कांग्रेस ओबीसी जिल्हा अध्यक्ष अरविंद वाढोणकर यांची भेट*

ByND NEWS INIDIA

Jun 9, 2022

*वरूड ज.उपोषणाला कांग्रेस ओबीसी जिल्हा अध्यक्ष अरविंद वाढोणकर यांची भेट*

 

 चेतन वर्मा तालुका प्रतिनिधी राळेगाव यवतमाळ:

 

राळेगाव तालुक्यातील वरूड जहांगीर येथील प्रसिद्ध असे रघुनाथ स्वामी महाराज मंदीराच्या विरोधात भ्रष्टाचार असल्याच्या आरोपावरून आणि काही इतर मागण्या घेऊन वरूड जहांगीर येथील उत्तमराव भोरे, गोविंदराव झाडे झरगड,अंगदराव आडे वरूड या तीन उपोषणकर्त्यानी दिनांक 6/6/2022 रोजी मंदीरातच उपोषण सुरू केले असून आज दिनांक 9/6/2022 रोजी. उपोषणाच्या मंडपाला भेट दिली आणि समस्या जाणून घेतली असता या मागण्या अगदी रास्त असून हा प्रश्न अगदी बरोबर असून ताबडतोब निकाली काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले असून या उपोषणकर्त्याच्या सभामंडपात काल थानेदार राळेगाव,तलाठी वरूड, आरोग्य अधिकारी या व्यतिरिक्त अरविंद वाढोणकर यांच्या शिवाय कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी भेट दिली नाही.त्यावेळी अरविंद वाढोणकर यांचे सोबत राळेगाव खरेदी विक्री संघाचे संचालक श्रावनसिंग वडते सर,झाडगाव देशोन्नती प्रतिनिधी सचिन राडे, पब्लिक पोष्टचे तालुका प्रतिनिधी मनोहर बोभाटे यांचेसह गावातील जनार्दन कडू,राहूल भोरेसह इतर मान्यवर उपस्थित होते.