• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

हर्ष पोद्दारांनी “बादल”पळविला आणि पहिल्यांदा महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिले..

 

ND NEWS |

हर्ष पोद्दार सध्या अमरावती येथील राज्य राखीव पोलीस दल गट IX चे कमांडंट आणि एसआरपीएफ नागपूरचे डीआयजी पदाचा देखील अतिरिक्त कार्यभार ते सक्षमपणे सांभाळत आहेत. या दोन्ही पदांचा भार पेलतानाच घोडसवारीतही त्यांनी ‘लगाम’ कसा सांभाळायचा असतो आणि घोडा कसा पळवायचा असतो याचा परिपाठ घालून दिला आहे. अखिल भारतीय पोलीस स्पर्धेत खुल्या हॅक्स स्पर्धेत त्यांच्यामुळे महाराष्ट्र पोलिसांना पहिले सुवर्णपदक मिळाले. चंदीगड येथील स्पर्धेत महाराष्ट्र राज्य पोलिसांचे पथक सहभागी झाले होते.
राज्य संघाचे नेतृत्व करत असलेल्या हर्ष पोद्दार यांनी मुंबई पोलिसांच्या काठियावाडी जातीच्या बादल नावाच्या घोड्यावर सवारी केली. बादलने या स्पर्धेत अव्वल स्थान मिळवले. ओपन हॅक्स इव्हेंटमध्ये, घोड्याच्या अनुरुपतेसह घोड्याचे चालण्याचे तंत्र आणि कमांडसची त्याची प्रतिसादक्षमता यांचे मूल्यांकन केले जाते. १९ राज्यांतील पोलीस आणि केंद्रीय निमलष्करी दलांनीही या स्पर्धेत भाग घेतला. इंग्रजी जातीच्या घोड्यांच्या जाती त्यांच्या सौम्यता आणि प्रतिसादासाठी आदर्श मानल्या जातात. काठियावाडी घोडे हे बिनधास्त असतात.
हर्ष पोद्दार यांनी कोलकाता येथील फोर्ट विल्यम्सचे प्रतिनिधित्व करत राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा जिंकली होती. दरम्यान, हर्ष पोद्दार यांनी युनाटेड किंगडमच्या ऑक्स्फर्ड विद्यापीठातून कायद्याची पदवी मिळविलेली आहे. नंतर इंग्लडच्या नामांकित मॅजिक सर्कल लॉ कंपनीत बॅरिस्टर असलेले हर्ष पोद्दार २०१३ साली भारतीय पोलिस सेवेत दाखल झाले. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवत भारतीय पोलिस सेवेत प्रवेश केला. मालेगावचे पोलिस अधीक्षक, बीडचे पोलिस अधीक्षक म्हणूनही त्यांनी काम केले.