• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या आदेशाने पांगरीत शनिवारी लसीकरण कार्यक्रम

नागरिकांनी कोरोना लसीकरणात सहभागी होऊन लाभ घ्यावा -सौ.अक्षता सुशील कराड

परळी l प्रतिनिधी: 
राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजयजी मुंडे साहेब यांच्या आदेशातून परळी तालुक्यातील मौजे पांगरी येथे सर्व ग्रामस्थांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. शनिवार, दि.10 एप्रिल रोजी सकाळी 11 ते दुपारी 5 या वेळेत होणाऱ्या या लसीकरण कार्यक्रमात 45 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या सर्व ग्रामस्थांनी सहभागी व्हावे असे आवाहन सरपंच सौ.अक्षता सुशील कराड, तालुका आरोग्य अधिकारी लक्ष्मण मोरे व ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीने करण्यात आले आहे.
राज्यात सध्या कोरोनाच्या विषाणूने हाहाकार घातला असून दररोज हजारोंच्या संख्येत रुग्ण वाढत आहेत. तशीच काहीशी परिस्थिती बीड जिल्ह्यातही आहे, परंतु पालकमंत्री ना.धनंजयजी मुंडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा नियंत्रित पद्धतीने काम करत आहे. जिल्ह्यातील एकही नागरिक लसीपासून वंचित राहू नये असे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांचे प्रयत्न आहेत. गावोगावीच्या नागरिकांना कोरोनाची लस उपलब्ध करून देण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. आज पांगरी येथे शनिवार, दि.10 एप्रिल रोजी सकाळी 11 ते दुपारी 5 या वेळेत लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. याच कार्यक्रमात सर्व ग्रामस्थांना मास्क आणि सॅनिटायझर वाटप करण्यात येत असून कार्यक्रमात अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले आहे. या लसीकरण मोहिमेत ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सरपंच सौ.अक्षता सुशील कराड, तालुका आरोग्य अधिकारी लक्ष्मण मोरे व सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीने करण्यात आले आहे.