• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

*शाळा महाविद्यालय परिसरात छेडछाड पथकाच्या फेऱ्या वाढवा.*भाजपा विधार्थी आघाडीची मागणी.*

ByND NEWS INIDIA

Mar 17, 2022

 

प्रतिनिधी (परळी): सागर रोडे

कोव्हीड 19 मुळे गेल्या दोन वर्षांनंतर शाळा महाविद्यालय ,क्लासेस नव्याने सुरू झाल्या आहेत.त्यात एस टी महामंडळाचा संप अनेक महिन्यांपासून सुरु असल्यामुळे विद्यार्थीनी ना खाजगी वाहनांनी प्रवास करावा लागत आहे.

यादरम्यान रोडरोमिओ ऑटो स्टॅन्ड वर मुलींना त्रास देण्याचा काम करत आहेत त्याच बरोबर शाळा महाविद्यालय शिकवणी या ठिकाणी रोड रोमिओ त्रास देण्याचा काम करत आहेत काही महाविद्यालयात तर बाहेरून येणारे रोड रोमिओ भांडण देखील करत असल्याचे निदर्शनास आले आहे यामुळे शाळा व महाविद्यालय परिसरात चिडीमार फेऱ्या वाढवून रोड रोमिओ वर कडक कारवाई करा या मागणीचे निवेदन भाजपा विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांना देण्यात आले यावेळी विद्यार्थी नेते अमोल वाघमारे,  मुंजा फड, आशीष मुंडेे, प्रदिप सुरवसे, सुशांत गोलार आधी उपस्थित होते.