• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

*केज 26 फेब्रुवारी पासूनच्या येथील मुंबई मराठा आरक्षण आंदोलनाच्या समर्थनार्थ बेमुदत धरणे आंदोलन*

ByND NEWS INIDIA

Feb 24, 2022

केज प्रतिनिधी : हनुमंत गव्हाणे

दि 26 फेब्रुवारी पासून मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू होणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या मराठा आरक्षण व इतर अत्यावश्यक सवलतीसाठी होणाऱ्या आंदोलनास केज आरक्षण कृती समिती व मराठा समन्वय समिती यांच्या वतीने पाठिंब्यासाठी केज तहासिलसमोर बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचे समन्वयक हनुमंत भोसले यांनी कळविले आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी विविध स्तरावर लढा सुरू आहे. मात्र यासाठी अनेक संविधानात्मक व न्यायालयीन अडचणी येत आहेत. यासाठी बराच काळ लागण्याची शक्यता आहे. या मध्यंतरीच्या काळात राज्यशासनाने आपल्या अधिकाराच्या अखत्यारीत सवलती व सुविधा मंजूर करून तात्काळ लागू कराव्यात अशी मागणी छत्रपती संभाजी राजे यांनी केली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, युवकांसाठी उद्योग प्रशिक्षण व आर्थिक मदत, अण्णासाहेब पाटील महामंडळास मोठा आर्थिक निधी यासह इतर अनेक बाबींचा समावेश आहे.
या आंदोलनासाठी कांही कार्यकर्ते मुंबई आंदोलनात सहभागी होण्यासाठी उद्या केजहून मुंबईला रवाना होतील तर बाकी केज शहर व तालुक्यातील कार्यकर्ते केज तहसील कार्याल्यासमोर 26 फेब्रुवारी पासून पाठिंब्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात येणार आहे.
तरी या आंदोलनात केज शहर व तालुक्यातील बहुजन समाज बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन समन्वय समिती व मराठा आरक्षण कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे. निवेदनावर हनुमंत भोसले, भाई मोहन गुंड, विकास मिरगणे, शिवाजी ठोंबरे, कैलास चाळक, अरविंद थोरात, रविकुमार गायकवाड, संजय नखाते, (चिंचोली माळी), हनुमंत गव्हाणे, (हादगांव), अभिजित घाटूळ, विकास घाटूळ (मस्साजोग), संदीप चाळक (लव्हरी), महेश थोरात व विष्णू यादव इत्यादींच्या स्वाक्षरी आहेत.
……………………
चौकट

या आंदोलनासाठी केज तालुका रिपाई (आठवले गट) च्या वतीने पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच केज तालुक्यातील चिंचोली (माळी) येथील ग्रामपंचायत च्या वतीने ठराव घेऊन पाठिंबा दिला आहे.