• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

 

  • विशेष बातमीपत्र : नितीन ढाकणे

बीड परळी

एकीकडे संचारबंदीमुळे घराबाहेर पडण्याची भीती, तर दुसरीकडे कामाअभावी पूर्ण कुटुंबाच्या पोटाला जाळणारी भूक… यामुळे यातूनच गोरगरीब फिरणाऱ्या ज्यांना कोणीच आधार नाही अश्यांची अवस्था म्हणजे त्यांना जेवणाची अडचण भासत आहे. मात्र.. नय्यर ग्रुपच्या वतीने शहरातील गोरगरीब व्यक्तींना आणि रस्त्यावर फिरनाऱ्यांना, मंदिर मस्जिद च्या बाहेर, रेल्वेस्टेशन अशा विविध ठिकाणी असणाऱ्या गोरगरीब लोकांना

 

विनामूल्य भोजन ते हि त्यांच्या पर्यंत जाऊन पोहनचवले जात आहे , जेवण पाणी इतर मदत  आदी माध्यमातून ही सेवा पुरवली जात आहे. समाजामध्ये वावरताना आपणास प्रत्येक प्रकारची माणसे मिळत असतात. काही माणसे ही इतरांना मदत करणारी असतात, आणि आजही समाजामध्ये माणुसकी शिल्लक आहे याचे ताजे उदाहरण अनुभवास येत आहे तो म्हणजे नय्यर ग्रुप च्या माध्यमातून

   

परळीतील गोरगरीबांना नय्यर ग्रुप परळी यांच्या माध्यमातून परिसरामध्ये रस्त्यावर ती फीरणाऱ्या आणि ज्यांना कोणत्याही प्रकारचा आधार नाही अशांना ते थांबतात त्या ठिकाणापर्यंत दोन वेळचं जेवण पोहोचवण्याचं काम नय्यर ग्रुप यांच्या माध्यमातून केल जात आहे याच प्रकारचे ग्रुप अनेक निर्माण व्हावेत व गोरगरीब जनतेला एक आधार मिळावा हाच आदर्श नय्यर ग्रुप यांच्या वतीने शहरा समोर ठेवला जात आहे.

 

ग्रुपच्या कार्याचं सर्व परळीकर स्वागत करत आहेत हा ग्रुप पाहून प्रत्येकाला असं वाटत आहे की आपण ही या प्रकारचे सहकार्य केले पाहिजे आपण समाजामध्ये राहतो आपण समाजाची सेवा सुद्धा केली पाहिजे याच उदात्त हेतूने नय्यर ग्रुप कार्य करत आहे .

शेख अश्फाक हे या ग्रुपचे अध्यक्ष आहेत त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून हे कार्य सुरु केले आहे त्यांना प्रत्येक सहकारी या कार्यामध्ये मनातुन मदत करत आहे व या सर्व माध्यमातून समाजाची एक प्रकारे सेवाच होत आहे असाच आदर्श सर्व परळी करांनी घ्यावा हीच अपेक्षा.