• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

बीड जिल्ह्याच्या खा.डॉ.प्रीतमताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त हादगांव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत खाऊचे वाटप

ByND NEWS INIDIA

Feb 18, 2022

केज प्रतिनिधी-हनुमंत गव्हाणे

दि १७ फेब्रुवारी २०२२ गुरुवार रोजी बीड जिल्ह्याच्या खा. डॉ. प्रीतमताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त हादगाव चे सरपंच सुनील आबा वायबसे व शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष उमेश दादा वायबसे यांच्या संयुक्त विद्यमानाने हादगांव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत खाऊचे वाटप

बीड जिल्ह्याच्या खा. डॉ.प्रीतमताई मुंडे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वांना असे आवाहन केले होते की दिनांक १७ फेब्रुवारी रोजी वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्यात यावेत माझ्या वाढदिवसानिमित्त कोणीही बॅनरबाजी न करता
वंचित दुर्लक्षित घटकातील नागरिकांना मदत करून वाढदिवस साजरा करावा असे आव्हान करण्यात आले होते या आवाहनाला प्रतिसाद देत हादगांवचे सरपंच सुनील आबा वायबसे व शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष उमेश दादा वायबसे यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक १७ फेब्रुवारी २०२२ गुरुवार रोजी हादगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये खाऊचे वाटप करण्यात आले यावेळी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष उमेश दादा वायबसे राहुल वायबसे व शाळेचे मुख्याध्यापक विनायक जोशी सर सहशिक्षिका यादव मॅडम व अंगणवाडी सेविका अनुसया वायबसे या उपस्थित होत्या.
खा.डॉ. प्रीतमताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळत होता