• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

परळी ग्रामीण पोलिसांनी आवळल्या थर्मल मधील भंगार चोरांच्या मुसक्या

परळी औष्णीक वीज निर्मिती केंद्रातुन वाहनाद्वारे भंगार चोरी करणाऱ्या तीन आरोपींना ग्रामीण पोलिसांनी  केली अटक.

परळी : परळी औष्णीक वीज निर्मिती केंद्रातील कूलिंग वॉटर परिसरातील भंगार चोरी केल्याप्रकरणी परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात कलम 379 भादंवि प्रमाणे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल होता.या गुन्ह्यातील आरोपींची नामनिश्चिती करुन तपास करण्याचे आव्हान ग्रामीण पोलिसांपुढे होते

.ग्रामीण पोलिस ठाण्याचे प्रभारी सपोनि मारुती,डिबीपथकातील पो.ना. केकान,जमादार केंद्रे,पो.शि. येरडलावार, पांचाळ यांनी आरोपींचे नावे कळल्यानंतर सापळा रचून बंडू लक्ष्मण जोगदंड,वय 40 वर्षे रा. भोपा ता. धारूर,शेख अन्वर शेख नूर वय 35 वर्षे रा. पाथरी,अमजद मुसा पठाण वय 23 वर्षे रा. भीमवाडी परळी यांना दि.7 रोजी अटक करून गुन्ह्यात गेलेले 01 क्विंटल 80 किलो स्क्रॅप लोखंड व चोरीसाठी सतत वापरण्यात येणारे चार चाकी छोटा हत्ती मॅजिक वाहन क्रमांक एम एच 23- 5598 असा एकूण 30,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.या प्रकरणातील जप्त केलेले वाहन देखील चोरीचे असण्याची दाट शक्यता असुन मूळ मालकाचा पूर्ण पत्ता मिळून येत नसल्याने पोलिस तपास करत आहेत.पुढील तपास जमादार केकान करीत आहेत.