• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

श्रेयवादातून प्रशासकीय मान्यता नसलेल्या केज प.स.इमारतीचा पंकजा मुंडेनीं केले लोकार्पण

ByND NEWS INIDIA

Jan 27, 2022

केज प्रतिनिधी : हनुमंत गव्हाणे

केज शहरात पंचायत समितीची भव्य दिव्य अशी ही इमारत उभारण्यात आली आहे या इमारतीच्या उद्घाटनासाठी अधिकृत प्रशासकीय मान्यता नसताना देखील श्रेय वादातून महाराष्ट्र राज्याच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी लोकार्पण केल्याची चर्चा नागरिकांतून केली जात आहे

केज पंचायत समिती इमारत बांधकामासाठी भारतीय जनता पार्टी सत्तेत असताना नऊ कोटी रुपयांचा निधी पंचायत समिती बांधकामासाठी दिला गेला होता सध्या या इमारतीचे काही काम राहिल्यामुळे ही पंचायत समिती इमारत गुत्तेदार आणि बांधकाम विभागाकडून केज पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे हस्तांतरित केलेली नसतानाही श्रेय वादातून या पंचायत समिती कार्यालयाचा लोकार्पण सोहळा अचानक आज दिनांक 25 जानेवारी मंगळवार रोजी केज पंचायत समितीचे सभापती पती विष्णू घुले यांनी आपल्याला राजकीय श्रेय मिळवण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे हट्ट धरून शासकीय प्रोटोकॉल न पाहता राजकीय पदावर नसलेल्या पंकजा मुंडे यांच्या हस्ते केज पंचायत समितीच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा केला हा लोकार्पण सोहळा फक्त आणि फक्त श्रेय वादातून करण्यात आला असल्याची चर्चा नागरिकांतून केली जात आहे

या लोकार्पण सोहळ्यास भारतीय जनता पार्टीच्या केज विधानसभेच्या आमदार नमिता मुंदडा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते रमेश आडसकर अक्षय मुंदडा पंचायत समिती सभापती परीमला विष्णू घुले भारतीय जनता पार्टीचे युवानेते विष्णू घुले उपसभापती ऋषिकेश आडसकर जि.प.सदस्य संतोष हांगे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.