• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

*केज नगरपंचायतीच्या चार जागांसाठी एकवीस उमेदवारांची होणार तगडी फाईट* *राष्ट्रवादी,काँग्रेसच्या प्रचारा पुढे शिवसेना,जनविकास आघाडीची दमछाक*

ByND NEWS INIDIA

Jan 17, 2022

 

*केज प्रतिनिधी : हनुमंत गव्हाणे*

 

केज नगरपंचायतीच्या १७ प्रभागाच्या जागांसाठी १३जागांची निवडणूक पुर्वी झालेली असुन,दि.१८रोजी उर्वरीत ४ जागांच्या निवडणूकीसाठी २१ उमेदवारांची तगडी फाईट होणार आहे.

राष्ट्रवादी शेकाप आघाडी, काँग्रेस, शिवसेना रिपाइं, जनविकास परिवर्तन आघाडी पुर्ण ताकदीने निवडणूकीच्या मैदानात उतरली आहे.

केज नगरपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी व काँग्रेसची प्रचाराची हवा जोरात असल्याची चर्चा जनतेमधून होत असुन, शिवसेना व जनविकास परिवर्तन आघाडीला प्रचार व जनतेचे मन जिंकण्यात यश मिळत नसल्याचे जनतेमधून बोलले जात आहे. त्यामुळे केज नगरपंचायत च्या उर्वरित चार जागांची निवडणूक शिवसेना व जनविकास आघाडीला जड जाण्याची शक्यता आहे. केज मधील जनता हि सामाजिक वसा जपणाऱ्या व अडचणीच्या वेळेला खंबीरपणे साथ देणाऱ्या उमेदवाराला निवडून देणार असल्याचे जनतेमधून चर्चा होत आहे.आणि ज्या उमेदवाराचे सामाजिक व राजकीय क्षेत्रात कुठलेही योगदान नाही अशा उमेदवारांना जनता मतदानाच्या रुपाने धडा शिकवणार असल्याची चर्चा जनतेमधून होत आहे.