• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

परळी-नंदागौळ रस्त्याचे काम बंद असल्याने  नागरिक त्रस्त काम सुरु करा अन्यथा आंदोलन-पापा गित्ते

ByDeepak Gitte

Apr 4, 2021

परळी-नंदागौळ रस्त्याचे काम बंद असल्याने  नागरिक त्रस्त
काम सुरु करा अन्यथा आंदोलन-पापा गित्ते

प्रतिनिधी-दिपक गित्ते
ND NEWS | दि ४-परळीहुन नंदागौळकडे जाणारा तसेच त्यापुढे पुस मार्गे बर्दापुर पर्यंतचा रस्ता खड्डेमय झाला असुन दुचाकीस्वर नागरिकांचे बेहाल होत असुन अनेकांना पाठीच्या मनक्याचा आजार जडले आहेत.या मुळे नंदागौळ च्या नागरिकांना प्रचंड प्रमाणात त्रास होत आहे,एखाद्या रुग्णाला जर परळी येथे वैद्यकीय इस्पितळात जायचे असेल तर 10 मिनिट ऐवजी 45 मिनिट वेळ रस्त्या मुळे लागत आहे!खड्या मुळे आणि शेतकरी लोकांचा माल खराब होत आहे मागील अनेक महिन्यापासुन बंद असलेले हे रस्त्याचे काम त्वरीत सुरु करावे अन्यथा ग्रामस्थांना सोबत घेवुन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजपा युवानेते रविंद्र पापा गित्ते यांनी दिला आहे.
परळी-अंबाजोगाई राज्य रस्त्याचे काम अतिशय संथ गतीने चालु असल्यामुळे परळी-नंदागौळ-पुस मार्गे अंबाजोगाई व लातुर कडे जाणार्‍यांची संख्या वाढली आहे. परंतु या रस्त्यावर जागोजागी प्रचंड खड्डेपडले आहेत. दुचाकीस्वरांना तर या रस्त्यावरुन जातांना अक्षरशा तारेवरची कसरत करावी लागत आहे. अनेकांना तर पाठीच्या आजाराने ग्रासले आहे.


या खड्डेमय रस्त्यावरुन सकाळी परळीला व अंबाजोगाईला जाणारे दुधवाले अनेकवेळा खड्डेचुकवतांना अपघात होऊन जखमी झाले आहेत. रुग्णालयात त्यांना हजारों रुपये खर्च करावा लागला आहे. याचे बांधकाम विभागाला कांही देणे घेणे नाही. अनेकवेळा मागणी करुनही या रस्त्याचे काम सुरु झालेले नाही. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाने परळी-नंदागौळ-पुस-बर्दापुर हा 28 किलोमिटरचा हायब्रिड अन्युईटी या योजनेअंतर्गत मान्यता मिळाली असुन यासाठी अंदाजीत 60 कोटी रुपयांची तरतुद केली आहे. मागील तीन ते चार महिन्यापासुन या रस्त्याचे काम बंद आहे या रस्त्याचे काम त्वरीत सुरु न केल्यास प्रशासना विरुध्द तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रविंद्र पापा गित्ते  यांनी दिला आहे.