• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

त्या कामाचे श्रेय धनंजय मुंडे यांचेच

परळी – गंगाखेड रस्त्याच्या मंजुरीचे आयते श्रेय मुंडे भगिनी घेत असल्या तरी या रस्त्यासाठी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.

जानेवारी महिन्यापासूनच परळी गंगाखेड नव्हे तर बीड जिल्ह्यातील विविध रस्त्यांच्या कामाला राष्ट्रीय महामार्गापासून पैसे मिळावेत यासाठी ते प्रयत्न करत आहेत

जानेवारी महिन्यात श्री नितीन गडकरी साहेब यांना भेटून त्यांनी दिलेले हे निवेदन.

याशिवाय नंतरच्या काळातही त्यांनी वेळोवेळी या कामासाठी पाठपुरावा केला.

मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे सत्तांतर झाल्यानंतर तातडीने परळी अंबाजोगाई या मागील पाच वर्षात 4 वेळा भूमिपूजन झालेल्या रस्त्याच्या कामाला गती मिळून हे काम पूर्णत्वाकडे आले आहे.

परळी धर्मापुरी कामाचे टेंडर निघाले असून , परळी बायपास , परळी इंजेगाव कामाची वर्क ऑर्डर निघाली आहे.

मागील 5 वर्षात राज्यात आणि केंद्रात सत्ता असतानाही विकासाचे कोणतेच काम न करता आलेल्या भगिनी आता मात्र आयते श्रेय घेण्याचा प्रयन्त करत आहेत.