• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

हदगाव येथे ग्रामपंचायत च्या वतीने सेवानिवृत्त सैनिक व सेवा गौरव पुरस्कार प्राप्त शिक्षकाचा सत्कार

ByND NEWS INIDIA

Oct 5, 2021

 

 

केज तालुक्यातील हादगाव येथील सेवानिवृत्त सैनिक यशवंतराव मोरे व सेवा गौरव पुरस्कार प्राप्त शिक्षक विष्णु भुजंग यादव यांचा आज दिनांक ५ ऑक्टोबर मंगळवार रोजी ग्रामपंचायत च्या वतीने सत्कार करण्यात आला

 

भारतीय सैन्यदलात सतरा वर्ष सेवा केलेले सेवानिवृत्त सैनिक यशवंतराव मोरे दिनांक 30 सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त झाले आहेत तसेच केज शहरातील राजर्षी शाहू विद्या मंदिर शाळेचे सह शिक्षक विष्णू भुजंग यादव यांना दि.3 ऑक्टोबर रोजी राजर्षी शाहू विद्या मंदिर शाळेच्या 30 व्या वर्धापन दिनानिमित्त सेवा गौरव हा पुरस्कार देण्यात देण्यात आला आहे

त्याबद्दल ग्रामपंचायत कार्यालय हदगाव च्या वतीने सेवानिवृत्त सैनिक यशवंतराव मोरे व सेवा गौरव पुरस्कार प्राप्त शिक्षक विष्णू भुजंग यादव यांचा ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी हादगाव चे सरपंच सुनील वायबसे ग्राम विकास अधिकारी वरपे साहेब पत्रकार गौतम बचुटे ॲड. संदीप मोरे चंद्रकांत हांगे चंद्रकांत यादव यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते