• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

 

 

केज प्रतिनिधी:हनुमंत गव्हाणे

 

एका हातात रुमण्यावर दुसरा हात व्यवस्थेच्या थोबाडावर टाकल्याशिवाय न्याय मिळणार नाही – मोहन गुंड

 

कृषी कायदे आणि कामगार कायद्या सह इतर प्रश्नावर आज भारत देश बंद पुकारण्यात आला होता त्या अनुषंगाने आज दि.२७ सप्टेंबर सोमवार राजी केज तालुक्यात संयुक्त किसान कामगार मोर्चाच्या वतीने

लातूर औरंगाबाद हावेवर भाई मोहन गुंड यांच्या नेतृत्वाखाली एक तास चक्काजाम आंदोलन करण्यात आले, या आंदोलनाला बहुजन रयत परिषदेचे रमेश तात्या गालफाडे,केज संघर्ष समितीचे हनुमंत भोसले काँग्रेसचे बाळासाहेब ठोंबरे प्रवीणकुमार शेप अमर पाटील कबीर इनामदार कपिल मस्के राष्ट्रवादीचे नंदकुमार मोराळे पिंटू ठोंबरे शरीफ सय्यद आमादमीचे नासिर मुंडे शेतकरी संघटनेचे अनिल रांजणकर अशोक गीते,जि डी देशमुख, छावाचे शिवाजी ठोंबरे,संभाजी ब्रिगेडचे कैलास चाळक मानोहित पार्टीचे अनिल गालफाडे, यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला या आंदोलनात ग्रामपंचायत कामगार संघटनेचे कल्याण चाटे हमाल मापाडी यशंवत गायकवाड,शेतकरी कामगार पक्षाचे भाई अशोक रोडे दिगंबर मगर राजेभाऊ पौळ अनिल गलांडे दत्ता थोरात सोमनाथ पवार विठ्ठल हुंबे हनुमंत चाळक अनेक कार्यकर्ते उपस्थित होते सरकारच्या विरोधामध्ये प्रचंड घोषणाबाजी करत

नव्याने पारीत केलेले तीन कृषी कायदे कामगार कायदे मध्ये बदल केलेला थांबवावा

देशात होत चाललेले खाजगीकरण थांबवावे,

नवीन विज बिल विधेयक रद्द करावे,

गॅस डिझेल पेट्रोलचे दर तात्काळ कमी करा,पीक विम्याची 2020 मधील रक्कम शेतकऱ्यांना तात्काळ द्यावी, अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट 50 हजार रुपये हेक्टरी मदत करा,

या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार यांनी स्वीकारले पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी अनेक लोकांची भाषणे झाली निवेदनात मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे,