• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

*जीवाचीवाडी परिसरातील अवैध धंदे बंद करा- राजेभाऊ फुंदे यांची तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी*

ByND NEWS INIDIA

Sep 14, 2021

 

*केज प्रतिनिधी : हनुमंत गव्हाणे*

 

केज तालुक्यातील जिवाचीवाडी परिसरातील अवैध धंदे बंद करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजेभाऊ विश्वनाथ फुंदे यांनी आज दिनांक १४ सप्टेंबर २०२१ मंगळवार रोजी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे

केज तालुक्यातील जिवाचीवाडी परिसरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट चालू असून याचा त्रास ग्रामस्थ महिला पुरुष व वृद्धांना सतत होत आहे जिवाचीवाडी परिसरात देशी व विदेशी बनावट दारू जुगार मटका तिरट व गांजा असे विविध प्रकारचे अवैध धंदे राजरोजपणे खुलेआम चालतात यामुळे अनेक जणांचे संसार उध्वस्त झाले असून अनेक जण आत्महत्येस प्रवृत्त झालेले आहेत तरी तहसीलदार साहेबांनी हा विषय गांभीर्याने घेऊन ताबडतोब बंदोबस्त करावा व अवैध धंदे तात्काळ बंद करावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजेभाऊ फुंदे यांच्याकडून निवेदनाद्वारे करण्यात आली आहे