• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

 

 

*केज तालुका प्रतिनिधी : हनुमंत गव्हाणे*

बीड जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या युवक जिल्हाध्यक्ष पदी केज येथील युवा नेते निलेश( बबलू) साखरे यांची श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशनव्ये नियुक्ती केली आहे. नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष निलेश केशव साखरे यांचे मुळगाव केज तालुक्यातील सौंदना हे असुन ते केज मध्ये गेल्या विस वर्षापासून वास्तव्यास आहेत. त्यांनी अनेक वेळा वंचित बहुजन समाजातील लोकांसाठी रस्त्यावर उतरून न्याय देण्यासाठी अंदोलन केले आहे. त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. कोरोना महामारिच्या काळात त्यांनी अनेक गरजुवंत कुटुंबांना आर्थिक तसेच जीवनावश्यक कीटचे वाटप केले आहे. मास्क व सॅनिटाइजर चे वाटप ही अनेक वेळा त्यांनी केले आहे. निलेश साखरे हे बबलू या टोपणनावाने प्रसिद्ध आहेत. बीड जिल्हा वंचित आघाडी युवक जिल्हाध्यक्ष पदी माझी निवड केल्याबद्दल श्रध्देय.बाळासाहेब आंबेडकर ,

प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा,प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे,निरीक्षक अक्षयजी बनसोडे यांचे मनस्वी आभार मानतो.या पुढील काळात बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात युवकांची संघटनात्मक बांधणी करून पक्ष बळकट आणि मजबूत करून माझी जबाबदारी प्रामाणिक पणे पार पाडण्याचा मी प्रयत्न करील. माझ्या वर विश्वास दाखवल्या बद्दल वंचित बहुजन युवा आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे जाहीर आभार मानतो. अशी प्रतिक्रिया निवड झाल्यानंतर निलेश साखरे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन युवा आघाडी बीड यांनी व्यक्त केली.