• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

महिला अधिकार मंच महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने महिलांच्या विविध मागण्यांसाठी गुरुवारी केज तहसील कार्यालयावर मोर्चा  

ByND NEWS INIDIA

Aug 25, 2021

 

केज प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे

 

     महिला अधिकार मंच महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने महिलांच्या विविध प्रश्नांसाठी दिनांक २६ ऑगस्ट २०२१गुरुवार रोजी दुपारी ठीक १:००वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून मंगळवार पेठ मार्गे मेन रोड केज वरून तहसील कार्यालयावर लोकशाही मार्गाने कायद्याचे पालन करून महिलांच्या विविध मागण्यांसाठी महिला अधिकार मंचाच्या अध्यक्षा मनिषा ताई घुले यांच्या नेतृत्वाखाली व मराठवाडा लोक विकास मंच यांच्या वतीने करण्यात येणार आहे

महिला अधिकार मंच यांच्या वतीने करण्यात आलेल्या मागण्या पुढील प्रमाणे:

१ घर व जमिनी पती-पत्नी यांच्या नावे करण्यात यावे

२ गर्भपातावर निर्बंध घालून तात्काळ कायदा करावा

३ गर्भपात करण्यात आलेल्या महिलांना पेन्शन लागू करावी ४निराधारांना पेन्शन योजना लागू करावी यासह इतर मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे निवेदन केज तहसील ला देण्यात आले.

             या निवेदनावर महिला अधिकार मंच महाराष्ट्र राज्य संघटनेच्या बीड जिल्हाध्यक्ष रजनीताई काकडे केज तालुका अध्यक्ष लक्ष्मीताई बोरा, कौशल्या थोरात, ज्योती साखरे, दिपाली गळंगे,शितल लांडगे,सुप्रिया गीते ,प्रतिभा देशमुख यांच्यासह इतर महिलांच्या स्वाक्षर्‍या आहेत.