• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

नगरपरिषद येथे स्थानिक संस्थेचे आमदार सुरेश धस यांची भेट; नाट्यग्रह साठी 25 लाख

ByND NEWS INIDIA

Aug 19, 2021

सुशिल टकले : तालुका प्रतिनिधी

गेवराई नगर परिषद येथे आज दिनांक 19 ऑगस्ट गुरुवार रोजी स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार सुरेश धस यांनी भेट देऊन नगरपरिषदेच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी गेवराई नगरपरिषद चे मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांनी आमदार सुरेश धस यांच्या समोर आमदार लक्ष्मण पवार यांनी गेवराई शहरात केलेल्या विविध विकास कामांचा आढावा सादर केला. गेवराई नगरपरिषद ही क- दर्जाची नगरपरिषद असुन देखील ऐवढे विकासात्मक कामे आमदार लक्ष्मण पवारांनी गेवराई शहरात करून दाखविल्या बद्दल आमदार सुरेश धसांनी आमदार लक्ष्मण पवारांचे व गेवराई नगरपरिषद चे कौतुक केले. यावेळी सुरेश धस यांनी गेवराई नगरपरिषदेला त्यांच्या वैयक्तिक फंडातून गेवराई शहरात सुरू असलेल्या नाट्यगृहाला 25 लाख रूपयाचा निधी देण्यास कबूल दिली आहे.
व गेवराई नगरपरिषद ला अॉक्सिजन कॉन्सनट्रेटर भेट दिले. यावेळी नगराध्यक्ष सुशील जवंजाळ व उपाध्यक्ष राजेंद्र राक्षसभुवनकर मुख्याधिकारी उमेश ढाकणे सर्व सभापती, नगरसेवक उपस्थित होते