• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

केज प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे

केज तालुक्यातील येवता येथील ह.भ.प.वै. पांडुरंग गोविंदराव ईनामदार, गुरुजी वय७८ वर्ष यांचे वृध्दपन काळाने दि. १५ रोजी सायंकाळी ५:३०वा. दुःख निधन झाले.ते येवतेश्वर विधालयात सेवानिवृत्त शिक्षक होते , किर्तनाच्या माध्यमातुन त्यांनी मोठया प्रमाणात जनजार्गती केली त्यांच्या पार्थीवावर अंत्य संस्कार दि.१६ रोजी सकाळी९:३०वा. येवता येथील त्यांच्या शेतात शोकाकुल वातावर्णात करण्यात आले. इनामदार गुरुजी यांचे वृध्दापन काळाने झालेल्या निधनाची वार्ता कळताच सुमारे विस गावातील जनसमुदाय त्यांचे चाहते, संत महंत, वारकरी, राजकिय नेते, ग्रामस्त हाजारोच्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पाश्चात मुले मधुकर, लक्ष्मण व मुली तिन असा परिवार असुन त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली ह.भ.प. भगवान महाराज वरपगावकर,ह.भ.प.श्रीराम महाराज विडेकर,ह.भ.प. समाधान महाराज शर्मा, ह.भ.प. नाना माहाराज कदम ने कनुरकर,भा.ज.पा. जेष्ठ नेते नंदुशेट मुंदडा,रा.कॉं.पा, जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परीषदचे उपाध्यक्ष बजरंग( बप्पा) सोनवणे, विडा जिल्हा परीषद सदस्य विजयकांत मुंडे,शे.का. प. जिल्हाध्यक्ष मोहन गुंड, पंचायत समिती सदस्य दत्तात्र्य उर्फ पिंटू ठोंबरे, केज व्यापारी संघाचे तालुका अध्यक्ष महादेव सुर्यवंशी व विविध गावचे आजी माजी सरपंच सेवा सह,सोसाटीचे चेअरमन यांनी श्रद्धांजली वाहीली