• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

सोनिजवळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिरातील अर्धवट कामे तात्काळ पूर्ण करा गावकऱ्यांची ग्रामपंचायत कडे निवेदनाद्वारे मागणी

ByND NEWS INIDIA

Aug 13, 2021

केज प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे

 

केज तालुक्यातील सोनिजवळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिरातील सुशोभीकरणाचे राहिलेले अर्धवट काम तात्काळ पूर्ण करा अशी मागणी सोनीजवळा येथील ग्रामस्थांनी सोनिजवळा ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी श्री वरपे साहेब व उपसरपंच दादासाहेब कोकाटे यांच्याकडे आज दिनांक 13 ऑगस्ट 2021 शुक्रवारी केली आहे

केज तालुक्यातील सोनिजावळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिरातील राहिलेले अर्धवट काम पूर्ण करावे अशी मागणी गावकऱ्यांच्या वतीने वारंवार करूनही हे काम मागील कित्येक दिवसापासून रखडत पडलेले आहे यामध्ये मार्बल स्टाईल फरशी बसवणे,सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, लाईट फिटिंग करणे इत्यादी कामे तात्काळ करण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे

निवेदनाची दखल घेऊन ग्रामपंचायत ने पुढील पंधरा दिवसात सुशोभीकरणाचे काम पूर्ण करावे अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे

या निवेदनावर

पटेल मिनाज ,अजय जोगदंड, शेख जीलानी ,अरुण पटेकर यांच्यासह गावातील 35 नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत .

ग्रामविकास अधिकारी वरपे साहेब यांच्याशी संपर्क साधला असता सुशोभीकरणाच्या कामास सध्या मंजुरी नसल्यामुळे मंजुरी मिळाल्यानंतर हे काम पूर्ण केले जाईल ग्राम विकास अधिकारी श्री वरपे यांचे मत

या निवेदनाच्या प्रतीलीपी तहसीलदार साहेब केज गटविकास अधिकारी केज व पोलीस ठाणे युसुफवडगाव यांना देण्यात आले आहेत.