• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

*पावसा अभावी केज तालुक्यातील पिके करपु लागली तत्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्या – संभाजी ब्रिगेड* संभाजी ब्रिगेडचे केज तहसिलदार यांना निवेदन सादर !!

ByND NEWS INIDIA

Aug 12, 2021

केज प्रतिनिधी : हनुमंत गव्हाणे

 

केज तालुक्यातील शेतकऱ्यांनी मागील दोन वर्षांपासून सुरू असलेल्या कोवीड सारख्या भयानक महामारीला तोंड देत व चोहोबाजूंनी निर्माण झालेल्या आर्थिक समस्यांना सामोरे जात आपण जगाचे पोशिंदे आहोत याची मनात खुणगाठ बांधुन शेतात काळ्या आईची मशागत करून बी- बियाणे , खते , औषधे , मजुर , मशागत याची तडजोड प्रसंगी व्याजाने , घरातील किडुक मिडुक मोडुन काळ्या आईची ओटी निसर्गाच्या भरवशावर भरली व पिकेही जोमदार आली परंतु भर जोमात असलेल्या पिकांना फुलांच्या भरातच पावसाने दडी मारल्याने पिके करपु लागली आहेत याच परिस्थितीला शासनाने योग्य वेळी लक्ष घालून शेतातील पिकांचे पंचनामे करावेत यासाठी संभाजी ब्रिगेड केज तालुक्याच्या वतीने केज तहसिलदार यांच्या मार्फत मा.कृषीमंत्री महाराष्ट्र राज्य , मा.पालकमंत्री बीड जिल्हा , मा.जिल्हाधिकारी बीड जिल्हा, कृषी कार्यालय केज यांना निवेदन सादर केले असुन सदरील निवेदनात नमूद केले आहे की आधीच कोरोनामुळे सर्व सामान्य शेतकऱ्यांचे हाल होत आहेत त्यातच शेतकरी वर्ग निसर्गाने साथ न दिल्याने हवालदिल झाला असुन यामुळे मागील पंधरा ते वीस दिवसांपासून पाऊस बंद झाल्यामुळे शेतातील सोयाबीन सह इतर पिके पाण्याअभावी करपु लागली आहेत या परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी शासनाने व प्रशासनाने केज तालुक्यातील शेतकरी वर्गाला तत्काळ भरीव मदत करावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे सदरील निवेदनावर संभाजी ब्रिगेड केज तालुका अध्यक्ष कैलास चाळक , अजित धपाटे , महावीर पटेकर , संजय लोंढे , अमोल मुळे , अमर धपाटे , राहुल पटेकर , दत्ता काकडे यांच्या स्वाक्षरी आहेत .

——————————————-

*चौकट*

 

शेतकऱ्यांचा आंत पाहु नका या शेतकऱ्यांनीच कोरना काळात जगाला जगवण्याचे काम केले आहे सर्व जग सगळ्याबाजुंनी संकटात सापडलेले असताना जगाचा पोशिंदा दिवस-रात्र मेहनत करून अन्नधान्य पुरवण्यासाठी जीवचे रान करत होता आणि आजही करत आहे याचे भान ठेवून शेतकऱ्यांना विनाअट मदत करावी व संकटातून बाहेर काढावे.

 

कैलास चाळक

संभाजी ब्रिगेड केज तालुका अध्यक्ष                                      ——————————————–