• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

केज शहरातील नागरीकांना तात्काळ प्राथमिक सुविधा द्या – जनविकास परिवर्तन आघाडी केज मागण्या मान्य न झाल्यास लोकशाही मार्गाने १५ ऑगस्ट रोजी बेमुदत उपोषण

ByND NEWS INIDIA

Aug 11, 2021

केज प्रतिनिधी : हनुमंत गव्हाणे

 

मागील दिड वर्षापासून नगरपंचायत मध्ये प्रशासकीय कारभार आहे .सध्या नगर पंचायत पुर्णतः वाऱ्यावर सोडल्या सारखी असून प्रचंड दुरावस्था शहराची झाली आहे . तेथील कर्मचाऱ्यावर अंकुश नसल्यामुळे ते बेजाबदार पणे नागरीकांशी वागत आहेत . तसेच नविन आलेल्या मुख्याधिकार्यांना प्रशासकीय कामाचा, नगपंचायतचा अनुभव नसल्यामुळे व त्याना महसुल प्रशासन व केज नगरपंचायत या दोन्ही ठिकाणी काम करावे लागत असल्यामुळे कुणाचाच कुणाला ताळमेळ राहिलेला दिसत नाही ” आंधळ दळतय नि कुत्र पिठ खातय अशीच अवस्था केज नगरपंचायची झालेली दिसत आहे.

सविस्तर वृत्त असे की जनविकास परिवर्तन आघाडी केज च्या वतीने केज नगरपंचायत चे मुख्यअधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले .सदरील निवेदनात केज नगरपंचायत च्या माध्यमातून केज शहरातील नागरिकांना प्राथमिक सुविधा द्याव्या तसेच

लवकरात लवकर नगर पंचायतनी स्वच्छता मोहिम हाती घ्यावी , स्वच्छ पाणी प्यायला द्यावे , पथदिवे चालू करावेत व मुलभुत सुविधा कडे लक्ष द्यावे ,केज शहरात १७ प्रभाग असून शहरात डासांचे प्रमाण वाढले आहे डेंग्यु व तापाचे प्रमाण वाढले आहे , नाल्याची स्वच्छता होत नाही , फवारणी केली जात नाही , यामुळे केज शहरात आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे . पाणी पुरवठा योजना ची पुर्णतः वाट लागली असुन फिल्टर बंद असल्यामुळे घाण पाणी नळाद्वारे येत आहे . नगर पंचायत मधील कर्मचारी काम करत नाहीत , तसेच सुचना फलक व प्रमाणपत्राचे दर दर्शनी भागात लावले पाहिजे . रमाई आवास योजना , पंतप्रधान घरकुल योजना चे हप्ते ताबडतोब वर्ग करावेत तसेच कचरा व्यवस्थापन करण्यात यावे. शहरातील नाल्या , तुटलेले पुल , रस्त्यावर पडलेले खड्डे याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी जर या मागण्या मान्य करून प्रत्यक्षात कारवाही केली नाही किंवा कामे करण्यास सुरुवात केली नाहीतर १५ ऑगस्ट रोजी केज नगरपंचायतच्या दालनामध्ये उपोषण करण्यात येईल असा इशारा एका निवेदनाव्दारे जनविकास परिवर्तन आघाडीचे नगरसेवक राजु इनामदार , अशोक गायकवाड , साजेद इनामदार , सुमेध शिंदे यानी दिला आहे .