• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास विलंब न लावता तात्काळ वाटप करावे- संभाजी ब्रिगेड

ByND NEWS INIDIA

Aug 6, 2021

केज प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे

 

केज तालुक्यातील राष्ट्रीय बँकांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज लवकरात लवकर द्यावे या आशयाचे निवेदन शुक्रवारी नायब तहसीलदार धस यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आले.

याविषयी सविस्तर वृत्त असे की सद्य परिस्थितीमध्ये शेतकरी वर्ग पेरणी केल्यामुळे आर्थिक अडचणीत आहे. तरी बँकांनी पिक कर्जास विलंब न करता तत्काळ मंजुरी देण्यात यावी, तसेच पीक कर्जाच्या फाईल दीड ते दोन महिने झाले बॅंकात पडुन आहेत तरी पीक कर्ज वाटप बँक अधिकारी व कर्मचारी हलगर्जीपणा करीत आहेत, सध्या कोवीड १९ मुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला आहे, तरी शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीक कर्ज वाटप करून दिलासा द्यावा अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल याची नोंद घ्यावी या आशयाचे निवेदन देण्यात आले यावेळी संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष कैलास चाळक, अजित धपाटे, विद्यार्थी परिषदेचे जिल्हा अध्यक्ष अभिषेक भिसे, महावीर पटेकर,  सचिन साखरे, आकाश शेळके इत्यादी उपस्थित होते.