• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

केज प्रतिनिधी: हनुमंत गव्हाणे

 

मागील पाच सहा दिवसात कोकण व पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे पुरामध्ये व दरड कोसळुन तेथील बरेचसे लोक गाढले गेले होते.तर जे वाचले तिथली गावच्या गावं टेकडीवर नेऊन सोडली‌.जी लोक दरड कोसळुन मेली त्यांना बाहेर काढण जिकीरीचे झाले त्यामुळे प्रशासनाने भावपुर्ण श्रद्धांजली वाहिली.इतकी विदारक परिस्थिती तिथल्या लोकांवर ओढवल्याची बातमी प्रसार माध्यमातुन वेगाने पसरली होती.त्या भागातील लोकांपर्यंत जाऊन त्यांना आधार देण्यासाठी केजकरांकडुन मदत जमा करण्यासाठी केजचे युवासेना तालुका प्रमुख अरविंद थोरात,शहरप्रमुख तात्या रोडे यांनी पुढाकार घेतला.मदत जमा करण्याकरीता त्यांनी दिलेल्या सोशल मिडियावरील हाकेला केजकरांनी भरभरुन प्रतिसाद दिला.इतकच नव्हें तर शिवसेना तालुकाप्रमुख रत्नाकर अप्पा शिंदे यांनी ५१ हजार रुपये किंमतीचे किराणा,कपडे,मेडीसीन दिले,तसेच जिल्हा परिषद सदस्य विजयकांत भैय्या मुंडे,अनिल दादा थोरात,शिवनंदन बँकेचे संचालक रघुनाथ थोरात,रामहरी कोल्हे,मुकुंद मामा कणसे,माजी.नगराध्यक्ष पशुपतीनाथ मामा दांगट,नायब तहसीलदार सचिन देशपांडे सर,नगरसेवक रवि भैय्या अंधारे,मस्साजोगचे संरपंच संतोष आण्णा देशमुख,पत्रकार धनंजय मामा कुलकर्णी,सामाजिक कार्यकर्ते भोसले सर,ज्ञानज्योती क्लासेस,मैत्री कलेक्शन,माऊली डेकोरेटर,विजय दादा चाळक,बालासाहेब चटप, हनुमंत गव्हाणे ,कृष्णा कळसकर सह बहुसंख्य केजकरांनी पुरग्रस्तांसाठी आपल्या घासातील घास दिला.केजकरांकडुन मदत जमा करण्यासाठी व जमा केलेली मदत पुरग्रस्तापर्यंत पोहोचविण्यासाठी अरविंद थोरात,तात्या रोडे,अनिकेत भैय्या शिंदे,विशाल भैय्या नाईकवाडे,दादा दांगट,ऋषिकेश घुले,विवेक गिरी,ज्ञानेश्वर शेळके,ज्ञानेश्वर बोबडे,अक्षय नाईकवाडे,मयुर थोरात,अविनाश करपे,शंकरसिंग गोखे,सुरज शेंडगे,अशोक थोरात,आण्णा पारवे,आदित्य बोबडे,किशोर जाधव,अमर करपे या युवकांनी मेहनत घेतली.