• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

*राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजित दादा पवार यांचा वाढदिवस संकल्प निरोगी बीड अभियान राबवुन साजरा.*

ByND NEWS INIDIA

Jul 22, 2021

*केज प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे*

 

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजित दादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राज्याचे आरोग्यमंत्री मा.राजेशजी टोपे साहेब यांच्या सूचनेनुसार व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजयजी मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शानाखाली केज येथील उपजिल्हा रुग्णालय येथे संकल्प निरोगी बीड अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.

 

यामध्ये डोळ्यांची (टाका) शस्त्रक्रिया, डोळ्यांची (बिना टाका) डोळ्यांची शस्त्रक्रिया गरोदर माता, जेष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी, रक्तदान शिबीर, तहसिल कार्यालय, पोलीस स्टेशन तसेच न्यायालय येथील कर्मचा-यांची रक्ताची तपासणी, रक्तदाब तपासणी मोफत करण्यात आली.

 

यावेळी विधान परिषदेचे आमदार संजय भाऊ दौंड, माजी आमदार.पृथ्वीराज साठे, उपसंचालक डॉ. एकनाथ माले, तालुकाध्यक्ष नंदकुमार मोराळे, युवक तालुकाध्यक्ष मुकुंद कणसे, जेष्ठ नेते नवाब मामु, बालासाहेब बोराडे, विलास जोगदंड, शहराध्यक्ष भाऊसाहेब गुंड, पंचायत समिती सदस्य शिवाजी चौधरी, पिंटु ठोंबरे, गुंडाप्पा भुसारी, प्रेमचंद कोकाटे, मुज्जो तांबोळी, विद्याताई तारळकर, हिंदी भाषिक सेलचे जिल्हाध्यक्ष शरीफभाई सय्यद, गणेश सावंत, श्रीकांत घुले, वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजय राऊत, डॉ.दिलीप चाळक, डॅा. केशव इंगोले, डॉ. बालासाहेब सोळुंके, डॅा. करपे, रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण नागरगोजे तसेच इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

 

तसेच रूग्णालयात रूग्णांना फळ वाटप व केज येथील दर्गा येथे अजित दादा पवार साहेब यांना उदंड आयुष्य लाभो यासाठी चादर अर्पण करण्यात आली.