• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

*नांदूरघाट येथे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व पालकमंत्री मा. धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त किराणा किटचे वाटप*

ByND NEWS INIDIA

Jul 17, 2021

*केज प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे*

 

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री मा.धनंजय मुंडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त नांदुर घाट येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे केज तालुका अध्यक्ष नंदू दादा मोराळे यांच्या संकल्पनेतून अपंग व्यक्तींना दि. १७ जुलै शनिवार रोजी किराणा किटचे साहित्य वाटप.

यावेळी उपस्थित अपंग व्यक्तींना संबोधित करताना व साहित्य वाटप करताना केज विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार पृथ्वीराज साठे साहेब. केज पंचायत समितीचे सदस्य प्रेमचंद बप्पा कोकाटे, पिंटू ठोंबरे, बंडू भाऊ चौधरी, भुसारी आप्पा, संजय गांधी निराधार कमिटीचे सदस्य बाबुराव सांगळे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा संघटक शरद वाघ, तालुका सरचिटणीस सुंदरराव हजारे, नांदुरघाट सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन नामदेव खाडे, ग्रंथालय विभागाच्या जिल्हाध्यक्ष विद्याताई तारळकर, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष रोहित हंगे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते कोंडीराम तात्या तारळकर, फुलचंद दादा मोराळे,सारंग आंधळे, मोतीराम पंडित,अभिमान उगलमुगले,अशोक गायकवाड, शंकर जाधव, प्रहार संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष,पत्रकार बंधू अमोल जाधव,श्रीकांत जाधव,

व सर्व नांदूर घाट जिल्हा परिषद सर्कल मधील राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे सरपंच,उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य,आजी-माजी चेअरमन यावेळी उपस्थित  होते .