• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

*केज प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे*

 

रोटरी क्लब ऑफ केज च्या अध्यक्षपदी बापूराव सिंगण तर सचिवपदी अरुण अंजान यांनी रविवारी पार पडलेल्या कार्यक्रमात पदभार स्वीकारला.

केज रोटरीचा पदग्रहन सोहळा रविवारी नियोजित प्रांतपाल रुकमेश जाखोटीया व उपप्रांतपाल अक्षय शेटे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी विद्यमान अध्यक्ष बापूराव सिंगण यांनी मागील वर्षीचे अध्यक्ष हनुमंत भोसले यांच्याकडून अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली तर विद्यमान सचिव अरुण अंजान यांनी मागील वर्षीचे सचिव धनराज पुरी यांच्याकडून सचिव पदाचा पदभार स्वीकारला.

यावेळी प्रमुख पाहुणे नियोजित प्रांतपाल (2022-23) यांनी रोटरी क्लब ऑफ केज च्या आजपर्यंत राबवण्यात आलेल्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. कोरोना लॉक डाऊन काळात अत्यंत बिकट परिस्थितीत क्लब ने राबवलेल्या विविध जनजागृती व लोकोपयोगी प्रकल्पाचीही त्यांनी प्रशंसा केली. उपप्रांतपाल अक्षय शेटे यांनी प्रांतपाल ओम मोतीपवळे यांच्या संदेशाचे वाचन करून क्लबसाठी प्रांतपाला कडून सर्व आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. संस्थापक अध्यक्ष हनुमंत भोसले यांनी केज रोटरीने आजपर्यंत केलेल्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी क्लबच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, डिस्ट्रिक्ट ऑफिसर्स, नवीन रोटरी सदस्य व इतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. नवीन सदस्य विद्यमान अध्यक्ष बापूराव सिंगण यांनी केज शहरात विविध उपक्रमासोबतच वृक्षारोपण मोहीम यशस्वी करणार असल्याचा निर्धार बोलून दाखवला.

यावेळी रो श्रीराम शेटे, वसंत चाळक, संजय डांगे व बापूराव वाळके यांना केज रोटरीचे सदस्यत्व देऊन स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादा जमाले पाटील व सूर्यकांत चवरे यांनी तर उपस्थितांचे आभार सचिव अरुण अंजान यांनी मानले. यावेळी बीड, आंबेजोगाई, माजलगाव सह इतर रोटरी सदस्य तसेच रोटरी परिवाराचे सर्व सदस्य, कुटुंबीय व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रोजेक्ट चेअरमन प्रवीण देशपांडे, पशुपतीनाथ दांगट यांच्यासह रोटरी परिवाराच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.