• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

*नांदुर घाट येथे प्रहार संघटनेच्या वतीने अपंगांच्या ५ टक्के निधी साठी ग्रामपंचायतला ताला ठोक आंदोलन*

ByND NEWS INIDIA

Jul 8, 2021

*केज प्रतिनिधी- हनुमंत गव्हाणे*

            केज तालुक्यातील नांदुर घाट येथे अपंगांच्या 5 टक्के निधी साठी प्रहार संघटनेच्या वतीने दिनांक 7 जुलै रोजी ग्रामपंचायत ला   ताला ठोक आंदोलन करण्यात आले.

           केज तालुक्यातील नांदुर घाट येथील ग्रामपंचायत ने 2014 ते 2021 या काळामध्ये अपंगांचा निधी वाटप केलेला नाही. कित्येक वेळा ग्रामपंचायतला निवेदन देऊन सुद्धा याकडे दुर्लक्ष केले जाते त्यामुळे आज दिनांक 7 जुलै बुधवार रोजी    मा. राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अपंगांना 5 टक्के निधी संदर्भात प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटना नांदुरघाट अध्यक्ष विशाल नाळपे उपाध्यक्ष दत्ता आंधळकर व प्रहार संघटनेचे सर्व कार्यकर्ते यांनी ग्रामपंचायतला ताला ठोक आंदोलन केले हे आंदोलन सरपंच पांडुरंग चांगण यांनी पंधरा दिवसात तुम्हाला निधी दिला जाईल अशा लेखी आश्‍वासनानंतर मागे घेण्यात आले.

यावेळी अशोक जाधव,गजानन जाधव, नाना काळे, हनुमंत कुंभार, सर्जेराव जाधव, नवनाथ काशीद, नवनाथ थोरात, शिवलिंग कोरे,लक्ष्मण जाधव,सुशीला देशमुख,निलावती दळवी, सचिन मुसळे,नितीन घोडके,भगवान गलांडे यांच्यासह प्रहार संघटनेचे कार्यकर्ते व पत्रकार अमोल जाधव पत्रकार श्रीकांत जाधव पत्रकार शिवराज आंधळकर हे यावेळी उपस्थित होते.