• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

ऑनलाइन हरभरा नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचे हरभरा शासकीय खरेदी केंद्रामार्फत लवकरात लवकर खरेदी करावा शेतकरी कामगार पक्षाची तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी*

ByND NEWS INIDIA

Jul 7, 2021

 

*केज प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे*

   ND NEWS:- केज तालुक्यातील ऑनलाइन हरभरा नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचे हरभरा शासकीय खरेदी केंद्रामार्फत लवकरात लवकर खरेदी करावा अन्यथा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने भाई मोहन गुंड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने दिनांक ७ जुलै बुधवार रोजी तहसीलदार यांच्याकडे दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे*

 

शासनाने हरभरा खरेदी ऑनलाईन केलेल्या शेतकऱ्यांचे हरभरा शासकीय खरेदी केंद्रामार्फत लवकरात लवकर खरेदी करणे आवश्यक आहे जेणेकरून गरीब शेतकऱ्यांना कोरोना काळामध्ये आर्थिक मदत होईल जर अशातच शासनाने हरभरा खरेदी केंद्र बंद केल्यामुळे शेतकऱ्यांची गळचेपी झालेली आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन खरेदी नोंदणी केलेली आहे त्या गरीब शेतकऱ्यांचा हरभरा शासकीय खरेदी केंद्रामार्फत लवकरात लवकर खरेदी करावी अन्यथा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने भाई मोहन गुंड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने दिनांक ७ जुलै 2021 बुधवार रोजी नायब तहसीलदार लक्ष्मण धस यांच्याकडे देण्यात आलेल्या निवेदनात द्वारे देण्यात आला आहे

 

या निवेदनावर शेतकरी कामगार पक्षाचे केज तालुका अध्यक्ष भाई प्रवीण खोडसे तालुका सरचिटणीस भाई मंगेश देशमुख भाई महेश गायकवाड भाई अशोक रोडे भाई अशोक डोंगरे भाई हनुमंत मोरे यांच्यासह शेतकरी कामगार पक्षाचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते