• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने नवनियुक्त गटविकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे यांचा सत्कार

ByND NEWS INIDIA

Jun 30, 2021

केज प्रतिनिधी :   हनुमंत गव्हाणे

 

पंचायत समिती केज येथील गटविकास अधिकारी दत्तात्रय दराडे सेवानिवृत्त होऊन गटविकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी दि.२४ जून रोजी पदभार स्वीकारला आहे त्यानिमित्ताने दि.२९ जून मंगळवार रोजी पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा शाल, हार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात व पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

या वेळी पुरोगामी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय मुजमुले,तालुकासचिव रंजित घाडगे,उपाध्यक्ष हनुमंत गव्हाणे व आदर्श गावकरी चे पत्रकार बाळासाहेब जाधव,दै.विवेकसिंधु चे पत्रकार दिनकर जाधव तसेच शेकाप चे तालुकाप्रमुख भाई प्रवीण खोडसे,भारतीय बौद्ध महासभेचे तालुकासरचिटणीस बालासाहेब जोगदंड उपस्थित होते.

पंचायत समिती केज येथील गटविकास अधिकारी दत्तात्रय दराडे विहित वयोमानानुसार दि ३१ मे २०२१ रोजी सेवानिवृत्त झाले आहेत .त्यांनतर केज पंचायत समिती येथील गटविकास अधिकारी पदाचा पदभार धारूर चे आर.एस.कांबळे यांच्याकडे सोपवण्यात आला होता परंतु आर.एस.कांबळे हे वैधकीय रजेवर असल्यामुळे गटविकास अधिकारी पदाचा पदभार हा विठ्ठल नागरगोजे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. या पूर्वी ही सदरील पदाचा कारभार हा नागरगोजे यांनी पाहिलेला आहे.

 

माझ्या हातून कुठलेही चुकीचे काम होणार नाही व मी ज्या पदावर आहे त्या अंतर्गत येणाऱ्या सर्व कामांना योग्य न्याय दिला जाईल असे आश्वासन ही यावेळी नवनियुक्त गटविकास अधिकारी नागरगोजे यांनी दिले .