• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

*केज प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे*

 

 

संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवश्री प्रविण ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई येथील शासकिय विश्रामगृहावर रविवारी सकाळी 10.00 वाजता घेण्यात आलेल्या बैठकित संभाजी ब्रिगेड या वैचारिक संघटनेसाठी श्रम, कौशल्य, वेळ, पैसा, बुद्धी यांच पंचदान देवून संघटनेत सातत्याने कार्यरत राहून सामाजिक कामे करून जनेसाठी अहोरात्र झटणारे शिवश्री कैलास चाळक यांच्या सामाजिक कार्याची दखल घेवून संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवश्री प्रविण ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवश्री कैलास चाळक यांची केज तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

 

याचबरोबर शिवश्री सचिन धनराज साखरे यांची तालुका कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली, शिवश्री महावीर अर्जून पटेकर यांची तालुका संघटकपदी तर शिवश्री गजानन अंबाड यांची जिल्हा संघटक पदी व शिवश्री रामराजे गलांडे यांची जिल्हा कोषाध्यक्ष पदी तर शिवश्री अभिषेक परमेश्वर भिसे यांची विद्यार्थी आघाडी चे जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली यावेळी रामकिसन मस्के सर , शिवश्री प्रविण ठोंबरे सर, ॲड पी.जी. शिंदे सर, शिवश्री पालकर सर, शिवश्री नानासाहेब धुमाळ सर, शिवश्री डॉ. वसंत उंबरे सर, शिवश्री अंगद गायकवाड, शिवश्री दुर्गेश जाधव, शिवश्री नारायण मुळे, शिवश्री संभाजी घोरपडे, शिवश्री बालासाहेब घोरपडे सर, शिवश्री राम ढोबळे सर, शिवश्री अनिल कोळी, शिवश्री धायगुडे कालीदास, शिवश्री साखरे सचिन, शिवश्री गोपाळ काटे, शिवश्री इंगळे सर, शिवश्री चाटे अर्जून, शिवश्री केशव टेहरे, शिवश्री गजानन अंबाड, शिवश्री रामराजे गलांडे, शिवश्री अभिषेक भिसे, शिवश्री प्रा. सुहास माने, शिवश्री देशमुख धनंजय इत्यादी उपस्थित होते या निवडी मुळे नवीन पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.