• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

*सरकारने ओबीसी समाजाच्या सहन शिलतेचा अंत पाहू नये; अन्यथा उद्रेक होईल – देशमुख, माने**- आंदोलकांना पोलिसांकडून अटक व सुटका.*

ByND NEWS INIDIA

Jun 27, 2021

सिरसाळा (प्रतिनीधी) : अमोल वाघमारे

 

OBC आरक्षण रद्द झाल्यानंतर समाज रस्त्यावर उतरून तीव्र रोष व्यक्त करत आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे , व प्रितम ताई मुंडे यांच्या अदेशा नुसार माजी आमदार आर टी जीजा देशमुख, भाजपा किसान मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य उत्तम दादा माने यांच्या नेतृत्वा खाली डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक सिरसाळा येथे चक्काजाम करण्यात आले.

सरकार ओबीसी आरक्षण टिकविण्यास अपयेशी ठरले आहे भाजप सरकारच्या काळात मराठा समाजाला आरक्षण दिलंपण तेही या सरकार ला टिकवण्यात आले नाही.

या सरकाने जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये अनेथा उद्रेक होइल असा इशारा या वेळी सरकार ला देण्यात आला.

चक्काजामनंतर राज्य सरकारने ओबीसी आरक्षणासंदर्भात योग्य निर्णय न घेतल्यास पुढील आंदोलन पंकजा ताई मुंडे यांच्या आदेशप्रमाणे आणखी तीव्र असेल, असा इशाराही या वेळी देण्यात आला.

सिरसाळा शहरातील चक्काजा मुळे एक तास वाहतूक खोळंबली होती. चक्काजाम आंदोलनाच्या वेळी राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. महाविकास आघाडीचा नाकर्तेपणामुळे ओबीसी समाज, मराठा समाज, यांच्या आरक्षणा संदर्भात अडचण निर्माण झाले आहेत. एवढं होत असतांना हे सरकार प्रत्येक प्रश्नासंदर्भात केंद्राकडे बोट दाखवतय. जर केंद्राकडे बोट करायचचं असेल तर महाराष्ट्राचा केंद्रशासित प्रदेश करायचा आहे का ? असा प्रश्न देखील उपस्थित करण्यात आला या वेळी या वेळी माजी सभापती प्रभाकर वाघमोडे, युवा नेते रोहित देशमुख, रंगनाथ सोळंके, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सुरेश माने, माजी उप सभापती बाबासाहेब काळे, अश्रूबा काळे ,बळीराम गडदे, हनुमंत नागरगोजे, मुन्ना काळे, कपिल चोपडे, बाबा शिंदे,भगवान राजे कदम, तुकाराम आचार्य, विष्णू रोडगे, सय्यद अयुब, गोविंद कांदे, विनायक गडदे, पिंटू कोपणर ,चंद्रकांत सोनवणे, कृष्णा सलगर इतर सर्व नेते कार्यकर्ते शेकडो च्या संख्येने उपस्थित होते.