• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

*पिट्टी घाट येथील अश्विनीला शिक्षणासाठी मदत करण्याचा दिलेला शब्द शिवसैनिक व सैनिक यांनी पाळला*

ByND NEWS INIDIA

Jun 26, 2021

*केज प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे*

 

मे महिन्यामध्ये अवकाळी पावसात नांदुर घाट शिवारामध्ये शेतात काम करत असताना गिताबाई ठोंबरे यांच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाला होता,तसेच त्यांचे पती जगन्नाथ ठोंबरे यांचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले होते.माता पित्याचे छत्र हरवलेली अश्विनी पोरकी झाली ही घटना घडताच केज तालुक्यामध्ये सामाजिक क्षेत्रात कायम अग्रेसर काम करणारे युवा सेना तालुका प्रमुख अरविंद थोरात व त्यांच्या सहकाऱ्यांनी अश्विनीला जीवनावश्यक लागणाऱ्या सर्व वस्तू जवळपास 12 ते 13 हजार रुपयांच्या दिल्या होत्या.तसेच त्यावेळी शिक्षणाचा जेवढा खर्च होईल तेवढा उचलण्याचा शब्द दिला होता.त्या शब्दाला जागत दि. २६ जून शनिवार रोजी केज वरून शिवसैनिक अरविंद थोरात व देशाचे रक्षक सैनिक गणेश लामतुरे यांनी येऊन अश्विनीला दहावीसाठी लागणारे सर्व शैक्षणिक साहित्य देण्यात आले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते पत्रकार अमोल जाधव,गोविंद तानगे व स्थानिक पीटी घाट येथील रहिवासी यांच्या हस्ते अश्विनी हिला साहित्य दिले व यापुढेही शिक्षणासाठी जो खर्च लागेल तो देण्याचा शब्द दिला.