• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

*समाज सेवक प्रताप भैय्या दातार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण.* *शिवसेनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले वृक्षारोपण*

ByND NEWS INIDIA

Jun 26, 2021

*केज प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे*

 

*केज तालुक्यातील बेलगाव येथील रहिवासी व माहिती अधिकार महासंघाचे बीड जिल्हा संघटक यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व विविध कार्यक्रम सोहळा दिनांक २५ जुन शुक्रवार रोजी संपन्न झाला.*

 

या बाबतची अधिक माहिती अशी की केज तालुक्यातील बेलगावचे भुमी पुत्र व माहिती अधिकार महासंघाचे बीड जिल्हा संघटक प्रताप भैय्या दातार यांच्या वाढदिवसानिमित्त वाघोली येथील भैरवनाथ मंदिर जवळील तलावाच्या कडेला शिवसेना पुणे जिल्हा अध्यक्ष व पुणे जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर (माऊली) कटके व वाघोली चे उपसरपंच रामकृष्ण आण्णा सातव पाटील , शिवसेना जिल्हा युवा अधिकारी , मच्छिंद्र भाऊ सातव, सुनील चाचा जाधवराव यांच्या हस्ते नारळाच्या झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले व प्रताप भैय्या दातार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित प्रवीण प्रधान, गोविंद साळुंके, प्राजक्ता जाधव, सहदेव दातार , निखिल सातव, सुरज सिंग , अमोल ससाने, कानिफनाथ गिते, पत्रकार अनंत जाधव , अनिल गिरे, हनुमंत दातार, अमोल माने, अमोल पवार, इत्यादींच्या उपस्थितीत वृक्षारोपण करून माहिती अधिकार महासंघाचे बीड जिल्हा संघटक प्रताप भैय्या दातार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.