• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

*केज प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे*

 

केज तालुक्यातील लव्हूरी केंद्रातील जिवाची वाडी आंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हनुमान वस्ती येथे आठ लक्ष रुपये निधी देऊन नविन शाळा इमारतीचे बांधकाम बीड जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष तथ शिक्षण सभापती , मा.बजरंग(बप्पा) सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरू करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक गोकुळ सारूक यांनी बजरंग(बप्पा) सोनवणे यांचा श्रीफळ शाल फेटा बांधुन ऱ्हदय सत्कार करण्यात आला ,सभापतीनी सांगीतले की जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हनुमान वस्ती ही इयत्ता पहिली ते पाचवी वर्ग असून अतिदुर्गम व डोंगरी भागात असलेने विधार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी हा निधी देण्यात आला आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दत्तात्रय उर्फ पिंटू ठोंबरे, केज पंचायत समिती सदस्य होते कार्यक्रमास विश्वनाथ गायकवाड, गट शिक्षणाधिकारी, सुनिलराव केंद्रे, केंद्रप्रमुख सुखदेव तोंडे, केंद्रीय मुख्याधापक श्रीराम चाटे, हनुमंत कटारे, बालासाहेब तांदळे, महावीर मोहिते, बळीराम चौरे, बाबा चौरे, भिमराव चाटे शाळेचे मुख्याधापक गोकुळ सारूक, शाळा व्यावस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य व वस्ती वरील ग्रामस्त कोविड१९चे नियम पाळून मोठया संख्येने उपस्थित होते.

(१)सभापती महोदय व त्यांचा ताफा डोंगर असलेने वहान जात नसलेने एक किलोमिटर पायी चालत जाऊन उपस्थिती लावली.

(२)जि.प.प्रा.शाळेस आणखी एक खोली इमारत देण्याचे कार्यक्रमात जाहिर केले.

(३) नियोजित कार्यक्रमास सायंकाळी आठ वाजलेने पाऊसात बॅट्रीच्या उजडाने पायी चालत यावे लागले.

(४) तिन वस्त्या वरील लोकांनी एकत्र येऊन सस्त्याची मागणी केली.