• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

*विडा जि.प.गटातील 60.50 लक्ष विकास कामांचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे यांच्या हस्ते भूमिपूजन* *विकास कामासाठी निधी कमी पडु देणार नाही – उपाध्यक्ष बजरंग सोनवणे*

ByND NEWS INIDIA

Jun 23, 2021

*केज प्रतिनिधी ÷ हनुमंत गव्हाणे*

 

विकास कामासाठी निधीची कमतरता भासु देणार नाही. माझा राजकीय जन्म याच मातीत झाला आहे.त्यामुळे विकास कामे करून या मातीतल्या लोकांचे मला सदैव ॠणी राहायचे आहे असे प्रतिपादन विडा जि.प.गटातील 60.50 लक्ष खर्चाच्या विविध विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी बजरंग सोनवणे यांनी केले.

15 व्या वित्त वार्षिक योजनेंतर्गत विडा जि.प.गटातील तब्बल 10 गावांच्या विकास कामांचे भूमिपूजन बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या हस्ते गुरुवार दि.23 जून 2021 रोजी अगदी मोजक्याच ग्रामस्थांच्या उपस्थितीत ठिकाणी कोरोना निर्बंध पाळुन करण्यात आले.

विडा जि.प.गटातील

1) कोटी – नवीन शाळा खोली बांधकाम करणे – 8 लक्ष

2) सासुरा – नवीनशाळा खोली बांधकाम करणे- 8 लक्ष

3) विडा वार्ड क्रं.1- सार्वजनिक जागेत विंधन विहीर व पंप बसविणे. 1.50 लक्ष

4) विडा वार्ड क्रं.2 – सार्वजनिक जागेत विंधन विहीर व पंप बसविणे.- 1.50 लक्ष

5) विडा ते बुरूंडवाडी रस्ता सुधारणा करणे.-10 लक्ष

6) बुरूंडवाडी – सार्वजनिक जागेत विंधन विहीर व पंप बसविणे- 1.50 लक्ष

7) बेंगळवाडी- सार्वजनिक जागेत विंधन विहीर व पंप बसविणे.1.50 लक्ष

8) बेंगळवाडी (सोंनदरा वस्ती ) – नवीन शाळा खोली बांधकाम करणे 8 लक्ष

9) कोरडेवाडी- सार्वजनिक जागेत विंधन विहीर व पंप बसविणे 1.50 लक्ष

10) घाटेवाडी – सार्वजनिक स्मशानभूमी बांधकाम करणे ! 3.00 लक्ष

11) काशीदवाडी – सार्वजनिक जागेत विंधन विहीर व पंप बसविणे. 1.50 लक्ष

12) येवता ! सार्वजनिक जागेत विंधन विहीर व पंप बसविणे.-1.50 लक्ष

13) येवता ! सार्वजनिक स्मशानभूमी संरक्षण भिंत बांधकाम करणे ! 5 लक्ष

14) जिवाचीवाडी (हनुमान वस्ती) ! शाळा खोली बांधकाम करणे.- 8 लक्ष

 

यावेळी विडा गणाचे पं.स.सदस्य दत्तात्रय (पिंटू) ठोंबरे,पटाईत सर, विडा उपसरपंच सदाशिव वाघमारे,गोवर्धन भोसले,नामदेव गायकवाड, उमरीचे उपसरपंच गणेश सावंत, कोटीचे सरपंच रामराजे डोंगरे,दादाराव वाघमारे, विश्वनाथ गायकवाड विडा जि.प.गटातील कार्यकर्ते उपस्थित होते.